अमरावती – सुनील भोळे
आपला देश विविविधतेने नटलेल्या अशा समृद्ध संस्कृतीची भूमी आहे. सर्वच धर्मात, संप्रदायात स्त्रियांचा आदर करण्याची मूल्य सांगितली जातात. हिंदू धर्मात तर देवी सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा यांची पूजा आणि स्तुती केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रू पक्षातील स्त्री मध्ये सुद्धा माता पाहिली व तिला सन्मानाची वागणूक दिली हीच खरी आपली भारतीय संस्कृती आहे.
एकीकडे मातृत्व दिन, रक्षाबंधन, भाऊबीज, महिला दिन साजरा केला जातो तर दुसरीकडे आई आणि बहिणींशी निगडीत स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा व अश्लाघ्य शिव्यांचा वापर भांडणाच्या वेळी तर सोडा इतर वेळी सुद्धा आजकाल सर्व धर्मातील व्यक्तींकडून सर्रासपणे केला जातो हि अत्यंत दुर्दैवाची व सामाजिक- नैतिक मूल्यांना पायदळी तुडविणारी बाब आहे. माता-भगिनींबद्दल अपशब्द वापरून एखाद्या व्यक्तीला मानसिक- भावनिक त्रास देण्याची , त्याचा अपमान करण्याची कृती निश्चितच विकृत मानसिकता दर्शविणारी आहे.
ज्या व्यक्तीचा अपमान करायचा आहे त्याच्या आई किंवा बहिणीबद्दल वाईट शब्द वापरले जातात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा अवमान होतो आणि त्या व्यक्तीमध्ये खजीलपणाची व संतापाची भावना निर्माण होते. त्याची परिणीती शिव्या देणाऱ्या व्यक्तीच्या हत्येत झाल्याची सुद्धा अनेक उदाहरणे आहेत.
भारताला पुन्हा जगातील एक सुसंस्कृत, अभिरूची संपन्न समाज बनविण्यासाठी, संविधानाच्या तरतुदींच्या सन्मानासाठी. लिंगाधारित समानतेसाठी व संस्कृतीच्या संरक्षणासाठी आता या अपशब्दांना, अशा शिव्यांना हद्दपार करावे लागेल व त्याकरिता महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्याने पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.
या संदर्भात महाराष्ट्र असोशिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) या संघटनेतर्फे शासनाला यापूर्वी निवेदन देण्यात आलेले होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ वुमेन स्टडीज सेंटर व “मास्वे” द्वारा नुकत्याच आयोजित सहविचार सभेत शिव्यामुक्त समाज अभियान समिती, अमरावती गठीत करण्यात आली असून समिती तर्फे शिव्यामुक्त समाज निर्मिती करित महाराष्ट्र शासनाने. १९ ऑगस्ट ला रक्षाबंधन (राखी पौर्णिमा) च्या मुहूर्तावर आपल्या राज्यात अशा शिव्यांचा वापरावर बंदीचा निर्णय जाहीर केल्यास तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांना समाज सुधारकांना मानाचा मुजरा आणि राज्यातील तमाम् लाडक्या माता-भगिनींचा सन्मान करणारी ओवाळणी ठरेल हे शासनाने लक्षात घेऊन समितीच्या पुढील मागण्यांची पूर्तता करावी, प्रा डॉ अंबादास मोहिते, एडवोकेट शितल मेटकर, रजिया सुलतान, डॉक्टर खडसे पंडित पडांगळे व इतर अनेक मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते.