Monday, November 25, 2024
Homeराज्यआषाढस्य प्रथम दिने...

आषाढस्य प्रथम दिने…

रामटेक – राजु कापसे

आज महाकवी कालिदास दिवस निमित्त पर्यावरणाचे संगोपन – संवर्धन – जतन करण्याचा एक भाग म्हणून श्री नंदेश शेळके सर यांच्या नेतृत्वात समर्थ कनिष्ठ महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षिका यांच्या सहाय्याने 12 हजार सीड बॉल बनवून गडमंदिर ते नागार्जुन मंदिर या चार किलोमीटर च्या परिसरात फेकण्यात आले. मुख्याध्यापक श्री शंखपाल लांजेवार सर यांनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

या उपक्रमात माजी मुख्याध्यापक श्री दीपक गिरधर ,सचिव श्री ऋषिकेश किंमतकर, सृष्टी सौंदर्य बहुउद्देशिय संस्थेचे श्री आनंद खंते, श्री प्रथमेश किंमतकर, समर्थ विद्यालयाचे गायकवाड सर,मेहर मॅडम,ठाकरे सर, वांद्रे मॅडम,देशमुख सर, बालपांडे मॅडम, कटरे सर , बारस्कर सर, गजभिये मॅडम, लांजेवार मॅडम, ढोरे मॅडम, प्रीत जांभूळकर, मनीष जूननकर प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी मनसर मोईल ने बस सेवा उपलब्ध करून दिली होती.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: