१८३ जणांची नेत्र तपासणी…
तेल्हारा – जिल्हा परिषद शाळा नेर येथे आरंभ ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य तेल्हारा तालुका शाखेच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दि ३० जुन रोजी करण्यात आले होते. नेत्र तपासणी शिबीरात सुमारे १८३ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराला पंचगव्हाण, पिवंदळ,सांगवी, उमरी या गावातील नागरिकांची नेत्र तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आरंभ ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कॅप्टन सुनिल डोबाळे यांचे हस्ते पार पडले.
प्रमुख पाहुणे म्हणून आरंभा च्या महिला आघाडी अध्यक्षा वंदना सुनिल डोबाळे,आरंभचे सचिव विशाल राठोड, सहसचिव तुषार अढाऊ, कोषाध्यक्ष हेमंत बेलोकार,कमलेश राठी मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुऱ्याचे तेजस बाभुळकर,आरती बारेला, राजेंद्र साळुंखे,रवींद्र खंडारे,जि प शाळा समिती अध्यक्ष राहुल तायडे, आरभं ऑर्गनायझेशन तेल्हारा शाखेचे अध्यक्ष मंगेश मोहोड,
सचिव गोविंदा सपकाळ व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश ढोकणे व गावातील प्रतिष्ठित नागरिक महादेव पारधी सुभाष टाले प्रकाश कापसे विनायक मोहोड विश्वनाथ मोहोड सुरेश तायडे राजपाल तायडे तंटामुक्ती अध्यक्ष बंडूभाऊ चौके ग्रा प सदस्य राजेंद्र तायडे सौ रेणुका मोहोड मधुकर तायडे सुनील तायडे अमर वानखडे ह्यांची उपस्थिती होती.