रामटेक – राजू कापसे
रामटेक :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर व राष्ट्रीय ओबीसी महासंघ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बालोदान रामटेक येथे ३० जूनला एक दिवसीय प्रशिक्षण शिविरचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण शिविर मधे ४० महिला व पुरुषानी भाग घेतला. अंधश्रद्धा निर्मुलन समिती नागपूरचे रामभाऊ डोंगरे, डॉ. सुनिल भगत, देवानंद बडगे, चंद्रशेखर मेश्राम, प्रिया गजभिये यांनी अंधश्रद्धा विषयी अनेक प्रात्यक्षीक करून दाखविले.
त्यानंतर त्यांनी भोंदू बाबा कशी हातचलाखी करतात व लोकांचे व महिलांचे आर्थिक शोषण करतात या विषयी स्वीस्तर सांगीतले. रामटेक करीता नविन कार्यकारीणी घोषित केली. नविन कार्यकारीणी मधे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश आष्टनकर, कार्याध्यक्ष कांचनमाला माकडे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भोयर, प्रधानसचिव नानाभाऊ उराडे, सायंस विश्लेषक मोरेश्वर माकडे,
मीडिया प्रमुख नत्थू घरजाडे, विद्या मुन याची निवड केली. संचालन कांचनमाला माकडे, प्रस्ताविक नानाभाऊ उराडे यांनी केल्या. या वेळी सुधाकर मोहोड़, डॉ. राजेश ठाकरे, राहुल जोहरे, आनंदराव चोपकर, रंगराव पाटिल, रूसतम मोटघरे, चंद्रशेखर जिभे, भाऊराव भिलावे, समतादूत राजेश राठोड, अरविंद कोहळे, सह उपस्थित होते.