रामटेक – राजु कापसे
रामटेक ही एक प्राचीन नगरी व प्रभु श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला राज्य शासनाने अर्थसंकल्पात मंजुरी दिली. रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक शहराचे सौद्रिकरण , गडमंदीर येथे आकर्षक विद्युत व्यवस्था,गडमंदीर येथे दुकानगाळे, अंबाळा येथे दुकानगाळे, विद्युत व्यवस्था, नारायण टेकडीचा विकास, कालिदास स्मारकाचा विकास,राखी तलाव विकास, रामटेक शहराला सुंदर बनविण्यासाठी, रामटेकचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी रामटेकच्या विकासाची पूर्ण नियोजन वास्तूशात्रा मार्फत केले व सदर बांधकाम करतांना रामटेकचा ‘ हेरिटेज ‘ व बांधकामाचा प्लान हा राज्य संरक्षीत स्मारकाचा सुसंगत केले असून देशातील विविध स्थळाचा विशेष करुण अयोध्येचा धर्तीवर रामटेकचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
रामटेकच्या विकासाच्या मूलभूत गरजा यांचा अभ्यास करून हे नियोजन कऱण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आशिष जयस्वाल यांच्या समवेत गडमंदीर येथे जाऊन सर्व परिसराची पाहणी केली होती. व रामटेकच्या नेहरू मैदानात दोघांनी हा निधी उपलब्ध करुन देऊ असे वचन दिले होते.
सदर कामे अर्थसंकल्पात समाविष्ट व्हावी याकरिता मंत्रालयात प्रत्येक स्तरावर आमदार आशिष जयस्वाल यांनी पाठपुरावा करून जिल्हा समितीची मंजुरी घेऊन राज्य समितीकडे सादर केले. व त्यांचा प्रयत्नाला मोठे यश आले आहे.
रामटेकच्या विकासासाठी अनेक प्रकल्प पूर्वीच हाती घेतलेले आहे. त्यातून अनेक कामे प्रगतीपथावर आहे. सुमारे रु.५० ते १०० कोटींचे कामे मागील एक वर्षात अतिरिक्त मंजुर करण्यात आले आहे. त्यातूनही अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहे.या अर्थसंकल्पात पहिल्यांदा रु .२११ कोटीचा निधिचा विकास आराखडा मंजुर झाल्याने अनेकांनी आमदार आशिष जयस्वाल यांचे अभिनंदन केले आहे.