कोला स्थानिक बाळापुर रोड परिसर स्थित व्ही एस इम्पेरियल शुक्रवार 21 जून 2024 ला दुपारी 04.00 वाजता लोकमत वृत्तपत्राकडून लोकनेता पुरस्कार 2024 चे आयोजन केल्या गेले होते. या समारंभात अकोला सोबतच बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात जनसामान्यात परिश्रमातून समाजकार्य ज्यांच्या हातून सतत घडत राहते समाज उपयोगी आवश्यक व गरजू लोकांपर्यंत शासन प्रशासनाच्या व इतर उपेक्षित सुख सुविधा पोहोचविण्याचे यथोचित सत्कार्य ज्या समाजसेवीरूपी लोकप्रतिनिधीच्या हातून घडत राहतो व आपल्या समाज उपयोगी कामाने लोकांच्या मनामध्ये ज्यांनी जागा निर्माण केली आहे. ज्यांच्या कार्याने समाजकार्य करणाऱ्या इतरांना प्रेरणा मिळते अशा व्यक्तींचा सन्मान म्हणून लोकमतने लोकनेता पुरस्कार देऊन गौरवान्वित केले आहे
(अकोला, वाशिम, बुलढाना जिल्हातून लोकप्रतिनिधी या सोहळ्यात पुरस्कार प्राप्त) पुरस्कार वितरणाकरिता मुख्य उपस्थित मान्यवर नवनिर्वाचित खासदार श्री अनुप भाऊ धोत्रे अकोला जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार साहेब, विधानपरिषद आमदार श्री अमोल मिटकरी, आमदार श्री अमित झनक मराठी सिनेअभिनेत्री दिपाली सैय्यद
सुनिल पवार कोण आहेत?…
विद्यार्थी दशेपासूनच समाजसेवेची आवड असताना सन 2002-03 पासूनप्रहार सामाजिक संघटनेत कार्य करणे व समाज उपयोगी गोरगरिबापर्यंत गरजू कार्य पोचविणे रक्तदान शिबिर घेणे, हेपीटाईटीज बी चे शिबिर घेणे, अपंगांना आवश्यक कुबड्या /तीन चाकी सायकल ची व्यवस्था करून देणे, सामाजिक संघटनेत कार्य करत असताना उपजिल्हा रुग्णालय मुर्तीजापुर नियमितपणे साफसफाई व स्वच्छता मोहिमे अंतर्गत संपूर्ण रुग्णालय व परिसर स्वच्छ ठेवणे…सामाजिक कार्याची जाण ठेवत जनतेने स्वयं स्फूर्तीने सुनील पवार यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये पुढाकार घेण्यास आग्रह धरणे…
प्रथमता नामनिर्देशित सदस्य नगरसेवक पदी येताच ज्या एरियात रहिवासी म्हणून मी वास्तव्याला आहे. त्या संपूर्ण एरियातील परिसरातील घरातील सांडपाणीचे जे गटार निर्माण झाले त्या साठी कोणत्याही व्यवस्थेतून का होईना सर्वप्रथम नाल्या तयार करून संपूर्ण परिसरला गटर मुक्त केले…सन 2016 निवडणुकीत बिनापक्ष म्हणजेच अपक्ष, घरामध्ये कोणताही राजकीय वारसा नसताना, राजकीय पाठबळ नसताना, सामाजिक समीकरण नसताना कोणत्याही प्रकारचा निवडणुकीवर आवास्तव खर्च न करता निवडणुकीत अपक्ष असताना विजय मिळवणे…व निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये समायोजित होऊन उत्कृष्ट राजकीय समन्वय ठेवत न.प. सभापती तसेच उपनगराध्यक्ष पद भूषविने अपक्ष नगरसेवकाच्या कार्यकाळात अतिशय ज्वलंत प्रश्न, पाणी प्रश्नावर कार्य करून प्रभागातील संपूर्ण 11 कॉलनी मधील पाणी प्रश्न नळ सप्लाय डिस्ट्रीब्यूशन समस्या निकाली काढणे…
संपूर्ण प्रभागांमध्ये स्वच्छता अभियानावर विशेष लक्ष देवून व कार्य करून राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री स्वच्छता वार्ड यामध्ये नेहमी मूर्तिजापूर नगरपरिषदेला सतत तीन वर्ष पारितोषिक मिळाली आहे तसेच मुख्यमंत्री स्वच्छता वार्ड अंतर्गत प्रभाग क्रमांक 11 हे अव्वल राहिले आहे
स्वच्छता अभियानाचे सतत तीन वर्षाचे पारितोषिक प्रभाग क्रमांक 11 मधील आशीर्वाद नगर,भट्टड नगर, पटवारी कॉलनी, अमृतवाडी, समता नगर, तिडके नगर, अशा भागाकरिता राज्य शासना कडून स्वच्छता अभियानाचे पारितोषिक व सन्मान मिळविले आहे….
“गिंनिस बुकऑफ रेकॉर्ड” मध्ये मुर्तीजापुर तालुक्यामध्ये नॅशनल हायवे 53 च्या कार्यामध्ये राजपथ इन्फ्राकॉम कंपनीमार्फत केलेल्या गिंनिस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पार्टिसिपेट करून वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नामांकन करून नावनोंद करणे…पावसाळ्यातील पाण्याला नाल्याच्या वाटे गावा बाहेर न जाऊ देता, मुर्तीजापुर शहराच्या मधोमध प्रभाग क्रमांक 11 मध्ये 750 मीटर लांब व 50 फूट रुंद असे मोठ मोठ्या गड्ड्यात या परिसरात पाणी अडवून गड्ड्यात जमिनीमध्ये पाणी मुरण्याचा अभिनव उपक्रम “रेन हार्वेस्टिंग” च्या माध्यमातून सतत मागील तीन वर्षापासून सुरू ठेवणे
भारतीय सिंधू सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला “संचालक” पदी सहकार क्षेत्रात सतत दोन वेळा बिनविरोध निवडून येणे…नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र “अकोला जिल्हाध्यक्ष” पदी मागील पाच वर्षापासून जिल्ह्याचा कारभार सांभाळणे या संपूर्ण कार्याची दखल घेऊन लोकमत वृत्तपत्राने आज माझ्या कामाची दखल घेने व लोकमत लोकनेता पुरस्काराने माझा कार्य गौरव केला त्यानिमित्त मी संपूर्ण लोकमत समूहाचे मनापासून आभार व धन्यवाद मानतो…
सुनील महादेवराव पवार
अकोला जिल्हाध्यक्ष नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र
मा. उपनगराध्यक्ष नगरसेवक नगरपरिषद मुर्तीजापुर तथा संचालक भारतीय सिंधू सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला…