David Johnson : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा माजी क्रिकेटर डेव्हिड जॉन्सनने आत्महत्या केली आहे. 53 वर्षीय डेव्हिड जॉन्सन यांनी बेंगळुरू येथे घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मात्र, त्याने असे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत माहिती देताना कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) अधिकाऱ्याने सांगितले की, दाऊद बाल्कनीतून पडल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी डेव्हिडला मृत घोषित केले. दरम्यान, कोत्तनूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून घटनेची माहिती गोळा करत आहेत.
कुटुंब: दोन मुले आणि पत्नी
डेव्हिड जॉन्सनच्या कुटुंबात पत्नीशिवाय दोन मुले आहेत. डेव्हिड जॉन्सन त्याच्या घराजवळ क्रिकेट अकादमी चालवत असे.
डेविन जॉन्सनची कारकीर्द कशी होती?
डेव्हिड जॉन्सनने भारतीय संघासाठी 2 कसोटी सामने खेळले आहेत. हे सामने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळले गेले. यामध्ये डेव्हिड जॉन्सनने 3 विकेट घेतल्या आणि 8 धावा केल्या. डेव्हिड जॉन्सनने 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 125 विकेट घेतल्या आहेत. 1996 मध्ये जवागल श्रीनाथच्या जागी डेव्हिडचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.
जय शहा आणि अनिल कुंबळे यांनी खंत व्यक्त केली
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, “आमचा माजी भारतीय गोलंदाज डेव्हिड जॉन्सनच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. डेव्हिडचे खेळातील योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्याचवेळी भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने त्याच्या X हँडलवर लिहिले की, “माझा क्रिकेट पार्टनर डेव्हिड जॉन्सनच्या निधनाच्या बातमीने दुःख झाले.
Deepest condolences to family and friends of our former Indian fast bowler David Johnson. His contributions to the game will always be remembered 🙏
— Jay Shah (@JayShah) June 20, 2024