रेती तस्करावर धडाकेबाज कारवाई…
रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यातील अवैध मार्गाने रेतीची तस्करी करीतअसलेल्या ट्रकवर रामटेक खिंडसी येथे महसुल विभागाने धडाकेबाज कारवाई केली असुन रेती तस्करांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री (दि.१९) जुन एका ट्रक वर ०९:१५ वाजताच्या सुमारास बँक आँफ महाराष्ट्र जवळ महसुल विभागाने कारवाई केली. रामटेक- तुमसर मार्गावरील खिंडसी जवळ केलेल्या कारवाईमध्ये विनापरवाना रेतीची वाहतुक करण्यात आली असुन त्याच्याकडुन ११ ब्रास रेती व ट्रक असा एकुण अंदाजे ३८ लक्ष ३२ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रामटेक महसुल पथक गस्तीवर असतांना त्पांना तुमसरहुन रामटेकच्या दिशेने रेतीची वाहतुक केली जात असल्याची माहीती मिळाली असता खिंडसी जवळील चौक राईस मिल जवळ नाकाबंदी करुन वाहनाची तपासनी करायला सुरुवात केली यात तहसिलदारांनी एमएच ४० सीव्ही ५९५८ क्रमांकांचा ट्रक थांबुन झडती घेतली असता त्या ट्रकमध्ये रेती आढळून येताच कागदप्रत्राची तपासणी केली. ती रेतीची बिनापरवाना वाहतुक असल्याचे स्पष्ट होताच ट्रक गांधी चौक जवळील महाराष्ट्र बँक समोर उभा करताच ट्रक चालक व त्यांचा साथीदार ट्रक ची चाबी सोबत घेवून ट्रक तिथेच सोडुन पळून गेला.
त्यांच्याकडून ट्रकसह रेती जप्त केली. या कारवाई मध्ये ३८ लक्ष रुपये किंमतीचा ट्रक व ३२ हजार रुपये किंमतीची ११ ब्रास रेती असा एकुण ३८ लक्ष ३२ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला. सदर मालक व चालक यांच्या विरुद्ध अप क्र ११२/ २०२४ कलम ३७९, १०९ भादवी सह कलम ४८(८) महाराष्ट्र महसुल अधिनियम अन्यवे गुन्हाची नोंद करण्यात आली. सदर कारवाही महसुल विभागाचे तहसिलदार रमेश कोळपे सह नायाब तहसिलदार भोजराज बडवाईक आदी कर्मचार्यांनी केली.