Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक पं.स.च्या नविन इमारत बांधकामासाठी पाच कोटी नव्व्यानव लक्ष रुपयांचा निधी मंजूर—आ.जयस्वाल...

रामटेक पं.स.च्या नविन इमारत बांधकामासाठी पाच कोटी नव्व्यानव लक्ष रुपयांचा निधी मंजूर—आ.जयस्वाल…

रामटेक – राजू कापसे

साठ वर्षांपूर्वी बांधलेली,अपुरी पडणारी व जिर्ण होत चाललेल्या रामटेक पंचायत समितीच्या इमारत बांधकामाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासाठी पाच कोटी नव्व्यानव लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहीती आ.आशिष जयस्वाल यांनी दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीच्या जागेवरच ही नविन इमारत बांधली जाणार आहे.
रामटेक पंस.ची प्रशासकीय इमारत ही अपुरी पडत होती.

या इमारतीमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांना बसायला जागा पुरेशी होत नव्हती.या इमारतीमध्ये तालुक्यातून येणार्‍या ग्रामीण नागरिकांना देखील याचा ञास सहन करावा लागायचा शिवाय ही इमारत साठ वर्षापूर्वी बांधलेली होती व ती पायव्यावर उभी आहे त्यामुळे सदर इमारत ही जीर्ण व खिळखिळी झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नविन इमारतीची मागणी होत होती तसा प्रस्ताव अनेक वर्षांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला होता.

आ.जयस्वाल यांनी देखील सातत्याने पाठपुरावा चालविला होता,परंतु इतरञ कुठेही मोठी शासकीय जागा उपलब्ध होत नव्हती आणि अस्तित्वात असलेल्या इमारतीची जागा पुरेशी नव्हती. जागेच्या अडचणीमुळे नविन इमारतीचा प्रस्ताव अडून पडला होता.

अखेर अस्तित्वात असलेल्या इमारतीच्या जागेवरच सदर इमारत पाडून त्याठिकाणी जी प्लप टू म्हणजेच दुमजली इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला आ.जयस्वाल यांनी पाठपुरावा करुन प्रशासकीय मान्यता व जवळपास सहा कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करुन घेतला.सदर शासन निर्णयाची प्रत त्यांनी वृत्तपञ प्रतिनिधींना उपलब्ध करुन दिली.

याशिवाय अंतर्गत सजावट फर्निचर. इंटेरियल, कंपाउंड वॉल, वॉटर टॅंक, परिसर विकास यासाठी पुन्हा नव्याने निधी मंजूर करण्यात येणार आहे. रामटेक तालुक्यातील विविध ग्राम पंचायतीच्या सामान्य नागरिकांना, पंचायत समितीत काम करण्याऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि येणाऱ्या सर्व नागरिकांना मोठी सुविधा या इमारतीमुळे मिळेल असा विश्वास आ.जयस्वालांनी व्यक्त केला.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: