पुणे येथील ग.दी. माडगूळकर सभागृहात संपन्न झाला सन्मान सोहळा…
पातुर – निशांत गवई
- अकोला जिल्ह्यातील पातुर येथील कवी, गायक, लेखक, नाट्य कलाकार, ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार देऊन त्यांचा पत्रकार क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य बद्दल गौरव करण्यात आला आहे पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पत्रकारिता क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन राष्ट्रपुरुष वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती उत्सव निमित्त राजपूत समाज पिंपरी चिंचवड या सामाजिक संस्थेच्या वतीने
16 जून 2024 रोजी करण्यात आले होते
यामध्ये आपल्या पत्रकार ते मध्ये लेखणीने विशिष्ट ठसा उमटवणारे अकोला जिल्ह्यातील पातुर येथील पत्रकार देवानंद गहिले यांना राज्यस्तरीय समाज रत्न पत्रकारिता पुरस्कार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते देण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजपूत समाजाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सिंह हजारी, सहाय्यक आयुक्त सिताराम बहुंरे, माजी नगरसेविका श्रीमती सुमनताई पवळे, एडवोकेट प्रताप परदेशी, राजन परदेशी, श्रद्धेय अनिल दादा मराठे, अवधेश कुमार सिंह, राम अवतार सिंह, नारायण सिंह सोनार, विजयसिंह राजपूत, प्रेमसिंह राठोड, महेंद्र परिहार, ठाकूर शिवकुमार सिंह बायस, व्याख्याते प्रा. सचिन देवरे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते
पातुर येथील देवानंद गहिले गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय विशेष पत्रकारिता करीत असल्याने या आधी सुद्धा त्यांना सन्मानित केल्या गेले आहे
श्री गहिले यांना अकोला येथून नैतिकतेचे प्रतिक पुरस्कार, संघर्ष पुरस्कार आणि त्यांच्या कवितांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त असून अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय संघटक तर पातुर तालुका आणि राष्ट्रीय ग्राहक पंचायत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष आहेत.
पुणे येथील पिंपरी चिंचवड येथील ग.दी. माडगूळकर नाट्य सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याचे संचालन नितीन चिलवंत व सुरेश तळेकर यांनी तर आभार प्रदर्शन देहू नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पौर्णिमा परदेशी यांनी केले श्री देवानंद गहिले या ग्रामीण भागात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराने राज्यस्तरावर पातूरचे नाव लौकिक केल्याने अकोला जिल्ह्यात देवानंद गहिले यांचे विविध स्तरावर कौतुक करण्यात येत आहे
प्रामाणिक पत्रकारिता केल्याचे फळ – देवानंद गहिले
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यामुळे सजग आणि समाजा भिमुख पत्रकारिता करणे आज गरजेचे आहे मी सुद्धा समाजातील उपेक्षित घटकांच्या बातम्यांना प्राधान्य देत आलो आहे तसेच अन्यायाविरुद्ध प्रहार करताना समाजातील उपेक्षित आणि गोरगरीब जनतेला काय अडचणी येतात हे सुद्धा पत्रकारांनी मांडून योग्य सकारात्मक पत्रकारिता केली तर समाज प्रबोधन होते प्रामाणिक पत्रकारिता केली तर त्याचे फळ निश्चितच मिळते असे विचार राज्यस्तरीय समाज रत्न पत्रकारिता पुरस्कार मिळाल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीशी मनोगत व्यक्त करताना श्री देवानंद गहिले यांनी विचार व्यक्त केले.