Wednesday, October 23, 2024
Homeराज्यपातुर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल..!

पातुर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल..!

पातूर – निशांत गवई

अलीकडे शाळकरी मुली व युवतींची छळ काढण्याच्या घटना प्रचंड वाढ झाली असून मजनू सैराट झाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. पातुर पोलीस ठाणे अंतर्गत रविवारी दोन अल्पवयीन मुलींचा वेगवेगळ्या घटना विनयभंग झाल्याने पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. या मजनूंना वठणीवर आणण्यासाठी जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून दामिनी पथक कार्यान्वित करण्यात आले होते मात्र हे पथक सबसेल अपयशी ठरल्याचे जाणवत आहे.

शनिवारी पातुर शहरातील एका सर्वसामान्य कुटुंबातील महिला शेत काम करण्यासाठी घरून निघून जाते तिची बारा वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून एका चाळीस वर्षे भामट्याने पाणी पिण्याच्या माध्यमातून तिच्या घरात प्रवेश केला पाणी पिल्यानंतर बार्शीटाकळी तालुक्यातील अजनी खुर्द येथील उमेश वासुदेव प्रधान या नराधमाची वासना जागृत झाली. त्याने आपले गुप्तांग काढून चिमुकलीला दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

इलेक्ट्रिक खांब उभारण्याचे काम हा भामटा करतो घटनेची वेळ दुपारी दोन वाजता ची आहे यावेळी सदर चिमुकलीची समवयस्कर मैत्रीण घरात असल्याने व दोघींनी आरडा ओरड केल्याने संभाव्य अनर्थ टळला सायंकाळी आई घरी आल्यानंतर तिने आप पिती कथन केली. यासंदर्भात महिलेच्या तक्रारीवरून उमेश प्रधान याच्याविरुद्ध विनयभंग व पोस्कोच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी घटना पातुर शहरातच घडली असून एका आरा मशीन वर काम करणारा मोमीन पुण्यातील रहिवासी सय्यद इर्शाद सय्यद तैसर या नराधमाने इयत्ता दहावी शिक्षण घेणाऱ्या सोळा वर्षीय मुलीचा गतपासा दिवसापासून पाठलाग सुरू केला होता ती शिकवणी वर्गाला जात असताना तिच्या मागे जाणे अश्लील हातवारे करणे आणि तिला आपल्या मोहजाळात अडकविण्याचा त्याने शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्याच्या या प्रयत्नाला भीक न घालणाऱ्या शाळकरी मुलीला रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सय्यद इशादने अडवून तिचा हात धरून तिला आय लव यू म्हटले व बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी मुलींना छळ काढणे त्यांचा विनयभंग करणे इतपत मजल या मजनूची जात आहे. त्यांना पोलीस न्यायव्यवस्था यांची कुठलीही भीती नसल्याचे जाणवत आहे.

यासंदर्भातही पातुर पोलिसांनी विनयभंग व पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. ठाणेदार किशोर शेळके व त्यांची चमू पुढील तपास करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: