पातूर वनविभागाची कारवाई…
पातूर – निशांत गवई
पातूर वनविभागाच्या राखीव जंगलातील सागवान वृक्षांची अवैधरित्या कत्तल करून तस्करी करणाऱ्या दोघांना पातूर वनविभागाने सापळा रचून अटक केली. दिनांक 14/06/2024 रोजी पातुर-बेलतळा रस्त्यावर वनराई गोरक्षण नजिक असलेल्या राखीव जंगलात दोन इसम अवैद्य वृक्षतोड करण्याकरीता गेले असल्याची गुप्त माहीती मिळाल्यावरून सापळा रचून वनविभागाच्या पथकास दोन इसमांना राखीव वनात अवैद्य वृक्षतोड करतांना रंगे हाथ पकडण्यात यश आले.
वनविभागाचे कर्मचारी यांना पाहताच आरोपी सैयद नसीम सैयद अब्बास (वय 47 वर्ष) व शेख अफसर शेख जहीर (वय 53 वर्ष) दोघेही राहणार मुजावर पुरा,पातूर यांनी पळ काढला असता वनपाल पी. डी. पाटील व वनरक्षक व्हि. बि. सोनुने यांनी आरोपींचा पाठलाग करून आरोपींना पकडले.
आरोपीने एकून 6 सागवान वृक्षांची तोड केली असून त्यापासून तयार केलेले एकुन 6 चौरस नग घ.मी. 0.049 किंम्मत 4606 रू. दोन लोखंडी कुऱ्हाड किंम्मत 500 रू. एक आरोपीचे मोबाईल असा एकूण 6106 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरूदध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) ड, अ, ई. फ. (1-अ) अ, 52 दिनांक 14/06/2024 अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला आहे.
सदर कार्यवाहीमध्ये वनरक्षक सि. डी. गवई, वनरक्षक व्हि. बि. सोनुने, वनपाल पी. डी. पाटील व वनपरीक्षेत्र अधिकारी प्रादेशिक. पातुर श्रीनिवास गव्हाने यांनी सहभाग नोंदविला असुन उपवनसंरक्षक अकोला कुमारस्वामी एस. आर., सहायक वनसरक्षक अकोला सु. अ. वडोदे, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रादेशिक पातुर गव्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल पातुर पी. डी. पाटील हे पुढील तपास करत आहेत.