मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
मूर्तिजापूर तालुक्यातील विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्षाच्या विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. मा. ना. एकनाथ शिंदे साहेब ,(मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब.(उप मुखयमंत्री व उर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांना उपविभागीय अधिकारी (महासुल) मुर्तिजापूर मार्फत , विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा करीता मागणी केली होती.
विदर्भ राज्य आंदोलन समिती, जिल्हा अकोला व मुर्तिजापूर यांच्या मागणीला यश प्राप्त झाले. याची तात्काळ दखल घेऊन संपूर्ण विदर्भातील जनतेनी ह्या मागणीला पाठिंबा दिला व रस्त्यावर आंदोलन केले त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जन आक्रोशाची दखल घेतली व घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घेतला.
तसेच लहान व्यवसाहीक यांनाही वगळण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा धडाका लावला होता त्यामुळे 2 कोटी 16 लाख सामान्य ग्राहांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत चे 4 कंपन्यांना दिले होते कंत्राट. स्मार्ट मीटर चे कंत्राट* अदानी पॉवर, जीनस कंपनी, एन सी सी कंपनी, मोंटेकारलो या कंपन्यांना देण्यात आले होते. आत्ता मात्र देवेंद्र फडणवीस उर्जा मंत्री यांच्या घोसनेमुळे सामान्य जनतेच्या वतीने *विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन * केल्या जात आहे.