Sunday, July 21, 2024
spot_img
Homeराज्यमूर्तिजापूर | विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात...

मूर्तिजापूर | विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

मूर्तिजापूर तालुक्यातील विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्षाच्या विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. मा. ना. एकनाथ शिंदे साहेब ,(मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब.(उप मुखयमंत्री व उर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांना उपविभागीय अधिकारी (महासुल) मुर्तिजापूर मार्फत , विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा करीता मागणी केली होती.

विदर्भ राज्य आंदोलन समिती, जिल्हा अकोला व मुर्तिजापूर यांच्या मागणीला यश प्राप्त झाले. याची तात्काळ दखल घेऊन संपूर्ण विदर्भातील जनतेनी ह्या मागणीला पाठिंबा दिला व रस्त्यावर आंदोलन केले त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जन आक्रोशाची दखल घेतली व घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घेतला.

तसेच लहान व्यवसाहीक यांनाही वगळण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा धडाका लावला होता त्यामुळे 2 कोटी 16 लाख सामान्य ग्राहांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत चे 4 कंपन्यांना दिले होते कंत्राट. स्मार्ट मीटर चे कंत्राट* अदानी पॉवर, जीनस कंपनी, एन सी सी कंपनी, मोंटेकारलो या कंपन्यांना देण्यात आले होते. आत्ता मात्र देवेंद्र फडणवीस उर्जा मंत्री यांच्या घोसनेमुळे सामान्य जनतेच्या वतीने *विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन * केल्या जात आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: