पातूर – निशांत गवई
पातुर तालुक्यात सातत्याने वीज खंडित राहते यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे या विद्युत खंडित राहत असल्याच्या निषेधार्थ युवा सेनेने आज बारा जून 2024 रोजी उपविभागीय विद्युत वितरण कार्यालय येथे या आंदोलन करून या घटनेचा निषेध केला आहे यावेळी निषेध करणारे निवेदन युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वामध्ये कंदील भेट देऊन युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्युत वितरण कार्यालयाला दिले आहे.
पातूर तालुक्यात विद्युत वितरण अधिकारी कर्मचारी वीच खंडित झाल्यास मोबाईल रिसीव्ह करत नाहीत मोबाईल बंद असतात तसेच मुख्यालय हजर राहत नाहीत कर्मचाऱ्यांनी मुख्यालय हजर राहावे मोबाईल रिसीव करावा आणि ग्रामस्थांना त्रास होऊ देऊ नये या मागणीचा समावेश या निवेदनामध्ये करण्यात आला.
या निवेदन देणाऱ्यांमध्ये सागर रामेकर उपजिल्हाप्रमुख युवा सेना, युवा सेनेचे विधी सेवा जिल्हाप्रमुख एडवोकेट महेश शिंदे, विशाल तेजवाल,राहुल देशमुख राहुल गवई, विशाल सोनवणे आकाश राऊत, छोटू ठाकरे, प्रवीण पोहरे, कार्तिक काळपांडे, निखिल बारतासे, यांच्यासह इतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा यावेळी समावेश होता.
मोबाईल बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी -सागर रामेकर उपजिल्हा युवा सेनेचे प्रमुख
पातुर तालुक्यात विद्युत खंडित झाल्यास विद्युत वितरण कार्यालयाकडून कुठलाही मेसेज येत नाही संबंधित कर्मचारी अधिकारी यांना मोबाईल द्वारे संपर्क करावा तर मोबाईल बंद ठेवण्यात येतो आणि कर्तव्यात कसूर केल्या जाते अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख यांनी यावेळी उपविभागीय अधिकारी विद्युत वितरण यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अधिकाऱ्यांची अनुपस्थिती
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्युत वितरण चे कार्यालयामध्ये या दिला असता बऱ्याच वेळ अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यानंतर या ठिकाणी अधिकारी आले नाहीत तब्बल अर्ध्या तासानंतर एका कर्मचाऱ्याला यावेळी निवेदन देण्यात आले अधिकारी मुख्यालय राहण्याची गरज आहे.