Monday, September 23, 2024
Homeराज्यपातूर | गोमातांना चारा देऊन वाढदिवस साजरा...

पातूर | गोमातांना चारा देऊन वाढदिवस साजरा…

पातुरच्या वनराई गोरक्षण संस्थेला मदतीचा हात…

पातूर – निशांत गवई

पातूर – सामाजिक दायित्वातून बाळापुर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मोठा वाजा गाजा न करता सामाजिक बांधिलकी जपत केला आमदार नितीन देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. पक्ष्यांसाठी पाणपोई, जाणवरांसाठी पाणवठे उभारण्यात आले. तर पातुरच्या वनराई गोरक्षण संस्थेतील गोमाताना चारा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

शिवसेना च्या वतीने परिसरात पक्ष्यांसाठी पाणपोई उभारण्यात आल्या. तसेच गु्रांसाठी पाणवठा तयार करण्यात आला. त्यांचप्रमाणे पातूर येथील वनराई गोरक्षण संस्थेतील शेकडो गोवंशाना चारा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेना चे शंकर देशमुख, अब्दुल खुद्दस . गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बोरकर, विठ्ठल राठोड, सुरज चव्हाण सह किराणा असोसिएशन चे असंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: