रामटेक – राजू कापसे
रामटेक दिनांक 5 जून 2024 रोजी शितलवाडी येथील रहिवाशांनी कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय यांना निवेदन दिले. शितलवाडी येथील वार्ड क्रमांकक 3 मध्ये 11 k.v. ची लाईन घरांना लागून तसेच घरांच्या वरून गेलेली आहे त्यामुळे लोकांच्या मनात दुर्घटना होण्यासंबंधीचे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
ती लाईन रस्त्यावरून गेलेल्या लाईन वर स्थानांतरित करण्यात यावी यासंबंधीचे निवेदन महावितरण कार्यालय मौदा येथे देण्यात आले त्यावेळी प्रवीण गिरडकर ,राजू कापसे, प्रशांत जाधव, धरमसिंग राठोड, सुनील कुदमलवार, वसंतराव चिंचोळकर ,डॉक्टर वाघमारे, उपस्थित होते
दुर्घटना होण्यास वेळ लागणार नाही…
विजेचे तार घरावरून गेलेले आहे, घराच्या अंगणात विजेचे खांब आहेत अशा परिस्थितीत पावसाळ्यामध्ये कोणतीही दुर्घटना नाकारता येत नाही .अंगणात किंवा गच्चीवर लहान मुले खेळत असतात पावसाळ्यामध्ये खांब ओला होतो त्यामुळे विजेच्या धक्का लागण्यास कोणताही वेळ लागणार नाही.
तसेच गच्चीवर किंवा घराला लागून असलेली लाईन त्यामुळे सुद्धा अपघात होऊशकतो असे शितलवाडी येथील रहिवाशांनी सांगितले तरी लवकरात लवकर ही लाईन रस्त्याच्या कडेला स्थानांतरित करण्यात यावी अशी आशा रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे.