अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या क्र. ३ च्या न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला २०० रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले असून श्री संजय रामकृष्ण वाकडे , वय- 51 वर्षे, पद – वरिष्ठ लिपिक, असे पकडण्यात आलेल्या आलोसेचे नाव आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.
यातील 35 वर्षीय तक्रादार यांचे पक्षकार यांचा वारसा हक्क प्रमाणपत्र बाबतचे कागदपत्र नक्कल विभागात पाठवण्याकरिता नमूद आलोसे यांनी तक्रारदार यांना 200 रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
वरून सापळा कारवाई केली असता आलोसे यांनी लाचेची रक्कम स्वतः पंचा समक्ष स्वीकारली करिता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
मार्गदर्शन –
1) मा. श्री. मारुती जगताप,
पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
2)श्री. अनिल पवार ,
अपर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
2) श्री मिलिंद बहाकर
पोलीस उपअधीक्षक
ला.प्र.वी.अमरावती
सापळा व तपास अधिकारी
श्री मंगेश मोहोड
पोलीस उपअधीक्षक,
अमरावती घटक, अमरावती
कारवाई पथक –
पो. अंमलदार – युवराज राठोड,
शैलेश कडू.
नितेश राठोड,
उपेंद्र थोरात
चालक गोवर्धन नाईक
सर्व ला.प्र.विभाग. अमरावती.
आलोसेचे सक्षम अधिकारी
मा. मुख्य न्यायाधीश ,
जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, अमरावती ,जि अमरावती
पोलीस उप अधीक्षक
*@दुरध्वनी क्रं – 0721- 2552355
मो.9158822676
7741967041
@टोल फ्रि क्रं 1064