गुणवत्तेच्या कुंचल्याने, तुम्ही अंधाराला सजविले, समतेच्या महाकाव्याने, तुम्ही समतेचे गीत गाईले…
अकोला – संतोषकुमार गवई
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील समतेचे महाकाव्य एक हजार कवितांचा प्रथम खंड १४ एप्रिल 2020 ला प्रकाशित झाला. या विश्वविक्रमी ग्रंथाची संकल्पना अकोल्याचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांची तर संपादन समन्वयकाची यशस्वी भूमिका शिर्ला (अंधारे )चे सुपुत्र प्रकाश अंधारे यांनी पार पाडली.
बाबासाहेबांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व प्रकारच्या कविता या ग्रंथात आहेत.
जगात आजवर एकाच महापुरुषावर 5000 कविता प्रकाशित झाल्याचे उदाहरण ऐकिवात नाही समतेचे महाकाव्य या ग्रंथाच्या माध्यमातून एक नवा विक्रम रचल्या जाणार आहे बाबासाहेबांवर आधारित 5000कविता एकूण पाच खंडांमध्ये प्रकाशित करण्याचा हा उपक्रम आहे. बाबासाहेबांना विश्वविक्रमाच्या माध्यमातून मानवंदना देण्यासाठीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असून भविष्यातही हा उपक्रम असाच सुरू राहणार आहे या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.
कार्यमग्न जीवन
प्रकाश अंधारे उपशिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त झाल्यावरही ते शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये शाळा तपासणी अधिकारी म्हणून सेवारत आहेत.
कृतार्थ जीवन
गुणवत्तेची जोपासना त्यांनी परिवारामध्ये सुद्धा केली त्यांच्या दोन्हीही कन्या तितिक्षा आणि समीक्षा डॉक्टर आहेत. सुविद्य पत्नी मीनाक्षी ताईचा यशस्वी वाटचालीत महत्त्वाचा वाटा आहे.
क्रांतीरत्न महाग्रंथ
क्रांतीची मशाल पेटवून सर्वंकष मानव मुक्तीच्या महाप्रयोगाचा आरंभ करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणजे एकोणिसाव्या शतकाला खऱ्या अर्थाने अलंकृत करणारे मानवी रत्न या महान विभूतींच्या कर्तृत्वाची गाथा सांगणारा हा क्रांतीरत्न महाग्रंथ सौ पुष्पा तायडे प्रकाश अंधारे व सहकाऱ्यांनी संपादित केला आहे. क्रांतीरत्न प्रकाशन द्वारे त्यांनी अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले ज्यामध्ये माझ्या गुण गातोआवडीने, कांचन छाया व ज्येष्ठांचा मी सांगाती या काव्यसंग्रहाचा समावेश आहे.
प्रकाश अंधारे हे ज्येष्ठ नागरिक चळवळीशी जुळलेले असून श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे हे शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक कार्य असेच बहरत राहो लेखन/संकल्पना नारायण अंधारे अध्यक्ष अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती.अकोला