मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
मूर्तिजापूर येथील क्रिडा क्षेत्रात नावलौकीक असलेल्या एम बी कराटेचे चमू ” नेपाळ ” येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने दिनांक २८ मे रोजी सायकांळी रवाना झाले आहेत. सदरची स्पर्धा दिनांक ३१ मे आणि १ जून रोजी नेपाळ येथे शितो रिई कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी एम बी कराटेचे संचालक सेंसई गंगाधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड झाली असून दिनांक २८ मे रोजी सायंकाळी मूर्तिजापूरातून रवाना झाले आहेत.
या स्पर्धेमध्ये आलोक इंगळे, वृषभ कोकाटे,उत्कर्ष गावंडे,आदित्य बोळे, विनय जामनिक, सागर कांबळे,आलोक इंगळे,दक्ष अग्रवाल,श्रृती चव्हाण, श्रीजे रोकडे,कर्तव्य अग्रवाल, राजवीर अनभोरे,विनय मोरे, देवांश भांडे, आनंद भदे, दिव्या थोरात, श्रावस्ती पंडीत, रियांश माकोडे इत्यादी विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने मूर्तिजापूर शहरासह तालुक्यासाठी गौरवास्पद बाब आहे यासाठी सर्वच स्तरातून शुभेच्छासह अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. रविंद्र गेठे, संतोष भांडे, मिलींद जामनिक,धनराज पंडीत, पंकज अग्रवाल, संदिप बोळे, सचीन गावंडे,सतीश इंगळे,राहुल रोकडे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.