Wednesday, July 24, 2024
spot_img
Homeराज्यआलेगाव येथील वाहतुकीच्या रस्त्यावर वाहनांचा खोडा...

आलेगाव येथील वाहतुकीच्या रस्त्यावर वाहनांचा खोडा…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील सर्वात मोठया ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या ग्राम आलेगाव येथील जुने बसस्थानक,श्रीकृष्ण आश्रम रस्ता,तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक आदि वाहतुकीच्या रस्त्यावर चारचाकी दुचाकी वाहन चालक, मोठ्या संख्येने वाहने उभे करुण ठेवत असल्यामुळे,इतर वाहन चालकांना सदरहु वाहनांचा नेहमीच त्रास होत आहे.

बरेच वेळा रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे किरकोळ वाद घडण्याचे प्रकार समोर आले आहेत.सदरच्या अडचणी मुळे आलेगाव येथील जुने बस स्थानका समोर बस येणे बंद होउन चार महीने झाले.त्यामुळे ग्रामस्थाना छत्रपति शिवाजी म चौका पासून पायी चालत यावे जावे लागत आहे.

त्यामुळे विद्यार्थिनी महिला व चिमुकल्या मुलांना पायी ये जा करावे लागत आहे.या गंभीर कड़े पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन वाहतुकिला अड्थड़ा करणाऱ्या वाहनावर करवाई करुण वाहतुकिचा रस्ता मोकळा ठेवणे गरजेचे आहे.अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: