Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहानगरपालिकेच्या वाहनतळातून कर्मचाऱ्याची मोटारसायकल चोरीला : नांदेडमध्ये मोटार सायकल चोरांचा सुळसुळाट...

महानगरपालिकेच्या वाहनतळातून कर्मचाऱ्याची मोटारसायकल चोरीला : नांदेडमध्ये मोटार सायकल चोरांचा सुळसुळाट…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड -वाघाळा महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीतील वाहनतळातून मनपा कर्मचाऱ्यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) दुपारी एक ते तीनच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार नोंदविण्यात आली आहे.या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत असलेले संजय कामाजी ढवळे यांनी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपली काळ्या रंगाची पेंशन प्रो मोटारसायकल (एमएच २६ बीएल ६९९५) मनपा इमारतीच्या वाहनतळात लावून कार्यालयात कामकाज करीत होते.

दुपारी एकच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने आपला चेहरा झाकून महानगरपालिकेच्या तळमजल्यावरील वाहनतळात पायी चालून प्रवेश केला. दुपारी तीनपूर्वी तेथून बाहेर पडत्ताना त्याने ढवळे यांची मोटारसायकल चोरून नेली. ही घटना महानगरपालिकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

या प्रकरणी ढवळे यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदविली असून, पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. दुचाकी पळविताना चोरट्याने आपले तोंड कपड्याने झाकून ठेवले होते. तेथून हा अज्ञात चोरटा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दिशेने पुढे निघून गेला.

पुढील फुटेजची पोलिसांनी तपासणी करून चोरट्यांचा शोध लावावा, अशी मागणी ढवळे यांनी केली आहे. शहरात मोटारसायकल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून मोटार सायकलचोरीचे प्रमाण दिवसोंदिवस वाढत असल्याने अनेकांना याचा फटका बसत आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: