अकोला – संतोषकुमार गवई
अकोला जिल्हयातील अ दर्जा मर्मस्थळ असलेल्या गायगाव येथील पेट्रोल डेपो येथे सुरक्षेच्या हेतुने मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी भेट दिली. सदर ठिकाणी बाळापुर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गोकुळराज, पो. नि. स्था. गु.शा. श्री. शंकर शेळके, पो.नि. जि.वि.शा श्री. प्रकाश तुनकलवार, पो.स्टे. उरळ चे ठाणेदार श्री. गोपाल ढोले, एटीबी चे पोउपनि. संतोष तिवारी यांची उपस्थिती होती.
भेटी दरम्यान सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर आयओसीएल येथे बिपीसीएल चे वरीष्ठ डेपो प्रबंधक संजय कुमार तसेच एचपीसीएल चे वरीष्ठ डेपो प्रबंधक लोकेश कुमार व आयओसीएल चे वरीष्ठ प्रबंधक मनिष प्रताप यांचे सोबत चर्चा करण्यात आली. सदर बैठकी दरम्यान सुरक्षा संबंधी अडीअडचणी संबंधाने उपाययोजना करण्याबाबत सुचना देण्यात आल्या त्यामध्ये हत्यारी गार्ड नेमण्याबाबत सुचित करण्यात आले, तसेच डेपोच्या सुरक्षेच्या हेतुने पोलीस चौकीची उभारणी साठी जागा उपलब्ध करण्याबाबत सुचविले व त्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. डेपो ची वाहतुक व्यवस्थे बाबत पाहणी केली असता डेपो समोरील रोडवर अपघात होवु नये यासाठी रोड सेप्टी बाबत पत्रव्यवहार करण्याबाबत सुचना देण्यात आल्या अकोला जिल्हयातील तापमानाचा विचार करता डेपो मध्ये पोलीस अधीक्षक यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.