UP Shahjahanpur : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे गिट्टीने भरलेला ट्रक एका पार्क केलेल्या व्होल्वो बसवर उलटल्याने भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 11 भाविकांचा मृत्यू झाला आणि 10 हून अधिक भाविक जखमी झाले. बसमध्ये सुमारे 70 लोक होते आणि ती सीतापूरहून उत्तराखंड पूर्णगिरीला जात होते, मात्र खुटार पोलीस स्टेशन अंतर्गत गोला बायपास रोडवरील एका ढाब्याच्या बाहेर अपघात झाला.
जेवणासाठी बस एका ढाब्यावर थांबली होती. यादरम्यान एक ट्रक आला आणि बाजूला आदळल्याने त्याचा तोल गेला आणि ट्रक बसवर पलटी झाला, त्यामुळे बसमध्ये बसलेले भाविक दबले गेले. लोकांसह इतर भाविकांनी बचाव कार्य केले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन, दोन्ही विस्कळीत वाहने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
बस कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले
शाहजहांपूरचे डीएम उमेश प्रताप सिंह यांनी अपघाताची पुष्टी करताना सांगितले की, ट्रकला धडक दिल्यानंतर तो बसवर पलटी झाला, त्यामुळे बसमध्ये बसलेले भाविक दबल्या गेले. मरण पावलेल्यांपैकी बहुतेक स्त्रिया आणि लहान मुले होती कारण पुरुष जेवण घेण्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी बाहेर गेले होते. जखमी भाविक सीतापूरच्या सिधौली येथील रहिवासी आहेत. सुमारे 3 तास बचावकार्य सुरू होते. ट्रक गिट्टीने भरलेला असल्याने तो सरळ करता येत नव्हता.
बसच्या काचा फोडून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच एसपी अशोक कुमार मीनाही घटनास्थळी आले. रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकले नसले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धडक होताच ट्रकचा चालक खाली उतरून घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस ट्रकची कागदपत्रे तपासून आरोपी चालकाचा शोध घेऊन त्याला अटक करतील.
#WATCH | UP: 11 people died and 10 injured after a truck turned turtle on top of a bus in Khutar PS area of Shahjahanpur. pic.twitter.com/LnlXU1UPIU
— ANI (@ANI) May 25, 2024
#WATCH | Ashok Kumar Meena, SP, Shahjahanpur says, " Around 11 pm, we got the information that in the Khutar PS area, a bus was parked, devotees who were going to Purnagiri were sitting inside the bus and some devotees were having food at a Dhaba. A truck lost control and turned… https://t.co/f94CWO919w pic.twitter.com/GHPyiEDOaD
— ANI (@ANI) May 25, 2024