Saturday, December 21, 2024
Homeगुन्हेगारीगोंदिया | एकाच रात्री पाच दुकानांत चोरी, तीन दुकानांतून रोख रक्कम लंपास...

गोंदिया | एकाच रात्री पाच दुकानांत चोरी, तीन दुकानांतून रोख रक्कम लंपास…

गोंदिया (तिरोडा) – बाजारात असलेल्या तीन दुकानात चोरी करून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली असून दोन दुकानांत मात्र चोरी करण्यात ते अपयशी ठरले. या घटनेनंतर मात्र शहरवासी व व्यापाऱ्यांत खळबळ माजली आहे.

गंज बाजारात दुकान असलेले संजय सहेजराम मेटवानी (५५, रा. संत तुकाराम वॉर्ड) यांच्या किराणा दुकानातून चोरट्यांनी २० हजार ४०० रुपये चोरून नेले. मनोहर सेवकराम छातानी (५५, रा. संत कवरराम वॉर्ड) यांच्या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ४०० रुपये रोख चोरून नेले. तर धनराज सेवकराम छत्तानी (६२, रा. नेहरू वॉर्ड) यांच्या किराणा दुकानातून चोरट्यांनी १० हजार रुपये चोरून नेले. एवढ्यावरच चोरटे थांबले नसून यानंतर त्यांनी तनुमल सेवकराम छत्तानी (रा. संत कवरराम वॉर्ड) यांच्या मेडिकल स्टोअर्सचे शटर तोडून

चोरीचा प्रयत्न केला. तसेच विजय द्वारका येरपुडे (५०, रा. संत कवरराम वॉर्ड) यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र या दोन दुकानांत चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. या घटने संदर्भात तिरोडा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार खांडेकर करीत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: