राजु कापसे
रामटेक
नंदिवर्धन विद्यालय, नगरधन (ता.रामटेक) या शाळेने फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक परीक्षेत चमकदार यश मिळविले आहे. एकूण 3 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून सरकारी शिष्यवृत्ती मिळवली आहे. इयत्ता 5 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा गुणवत्तेचा आलेख सातत्याने वाढत आहे.
इयत्ता पाचवीतील कु. माही सुरेश तितीरमारे, कु. निधी शेखर शरनागत, कु. लक्ष्मी नागेश हिंगवे या विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा मान मिळाल्याबद्दल नगरधन व परिसरातून अभिनंदन होत आहे. इयत्ता 5 वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मा. दीपक मोहोड सर मार्गदर्शक शिक्षक सुनिल बारस्कर सर, उज्वला अंबुलकर मॅडम, अंजली शेष मॅडम, कैलास मानवटकर सर, भीमराज घरजाळे सर, सिकंदर दमाहे सर,येयेवार सर, बावनगडे मॅडम तसेच आपल्या आई वडिलांना दिले.
शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा यशस्वी विध्यार्थीनींचे अभिनंदन केले.