Friday, July 12, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीमालेगाव | पोटात चाकूने वार करून एकाला केले जखमी...

मालेगाव | पोटात चाकूने वार करून एकाला केले जखमी…

चंद्रकांत गायकवाड,मालेगाव वाशिम
मालेगाव ता 8 – मेडशी येथे दोघा जणांनी एकाच्या पोटात चाकूने पोटात वार करून जखमी केल्याची घटना ता 7 मे रोजी दुपारी 3.30 ते 4.00 वाजताच्या दरम्यान मेडशी येथील गवळीपुरा परिसरात घडली.

याबाबत मेडशी येथील शब्बीर कासम रेघीवाले यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की वाशिम येथील नदीम इमाम रेघीवाले व यासिम कासम चौधरी या दोघांनी संगणमत करून वाद करून रागाच्या भरात त्यांचा मामा निम्मु इमाम गौरे यास चाकूने पोटात वार करून जखमी केली या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या दोघाविरुद्ध भादवी कलम 307, 34 नुसार गुन्ह्याची नोंद केली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील तायडे करीत आहे

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: