Akola-Amravati Loksabha : काल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांतपूर्ण पार पडल्या 06 – अकोला मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत 52.69 टक्के मतदान झाले. तर अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. हीच परिस्थिती अमरावती जिल्हयात पहायला मिळाली अंजनगाव सूर्जी येथे रात्री ९ वाजे पर्यंत मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे अंतरिम आकडेवारीला रात्री उशिरा झाला तर अकोल्यात मतदानाचे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती येथे ही 60% मतदान झाले असल्याचे सरकारी आकडे बाहेर आले आहेत.
अमरावती अनेक मतदान केंद्रांवर दुपारीही मतदान चांगला प्रतिसाद पहायला मिळाला मात्र अनेक मतदार केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मतदार व्याकूळ झाले होते. पोलिंग अधिकारी एवढ्या संथगतीने काम करीत होते की 10 लोकांना मतदान करण्यासाठी 1 तासाचा कालावधी लागत होता, त्यामुळे मतदार केंद्रावर रांगा पाहायला मिळाल्या. मतदारांना भर उन्हात अपुऱ्या सावली अभावी उन्हात ताटकळत उभे राहावे लागत होते.
अमरावती शहरातील अनेक मतदार केंद्रांवर राणा दाम्पत्य जाऊन बिन्धास्त प्रचार करतांना दिसत होते मात्र कोणत्याही पोलिंग अधिकाऱ्याची हिम्मत झाली नाही त्यांना बाहेर पाठविण्याची शेवटी मतदारांनीच त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं त्यामुळे थोडाफार गोंधळ उडाला होता मात्र नंतर सुरळीत मतदान पार पडले. मात्र राणा दाम्पत्याच्या मतदार केंद्रावर भेटीमुळे मतदान तर मिळाले नसणार,कारण त्याच मतदार केंद्रावर जाऊन लोकांना जबरदस्ती राम राम करून मतदान मागण्याचा केविलवाणा प्रयत्न निष्फळ ठरू शकते.
सुरुवातीला अकोल्यात काही ठिकाणी प्रकाश आंबेडकर आणि धोत्रेची हवा होती नंतर एका तासांनी हवा पलटली आणि अभय पाटील आघाडीवर असल्याचे समजले मुस्लिम मतदारांनी डॉ साहेबांना उचलल तर ते शेवट पर्यंत नाव ऐकायला मिळालं. अकोल्यात जरी तिरंगी लढत असली तरी नाव मात्र अभय पाटील यांचं येत आहे. कारण अकोल्यात मुस्लीम मतदार निर्णायक ठरणार आहे.
अमरावती मध्ये सुद्धा सुरुवातीला राणा यांची हवा होती, 10 नंतर हवा बदलली ते थेट रात्री उशिरा पर्यंत एकच नाव ते म्हणजे बळवंत वानखडे त्यामुळे दोन मतदार संघात सारखीच परिस्थिती असून दोन्ही मतदार संघात 60% मतदान झाल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. मात्र शेवटी मतदारच ठरवू शकतात…