Monday, September 23, 2024
Homeराज्यखोडगाव येथे २५ एप्रील पासुन संगीतमय श्रीराम कथा महोत्सव - कार्यक्रमादरम्यानच उरकणार...

खोडगाव येथे २५ एप्रील पासुन संगीतमय श्रीराम कथा महोत्सव – कार्यक्रमादरम्यानच उरकणार गरीब मुलीचा विवाह सोहळा…

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुक्यातील खोडगाव ( काचुरवाही) येथील हनुमान मंदिरात अयोध्या येथे श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठा निमित्याने दि. २५ एप्रिलपासून २ मे पर्यंत श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा यादरम्यान येथे दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार असुन याचा ज्यास्तीत ज्यास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहण हनुमान मंदीर समिती व समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमामध्ये दररोज सकाळी ६ ते ८ वाजता पर्यंत काकडा भजन व दिंडी, त्यानंतर ९ ते ११ वाजेपर्यंत व सायंकाळी ७ ते ९.३० वाजता पर्यंत रामकथा होणार आहे. तसेच महोत्सवा दरम्यान हरीपाठ सुद्धा होणार आहे. गु.ह.भ.प. वाणीभुषण श्री नारायण महाराज शेंडे हे कथा प्रवक्ता राहणार आहे.

दि. १ मे ला होम हवण व विशाल दिंडी सोहळा, हरीकिर्तन तथा २ मे ला काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यानच याच दिवशी गावातीलच एका गरीब लेकीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: