अशोकरावावरील नाराजी प्रतापरावाना भोवणार काय…?खुद भाजप कार्यकर्त्यांचा दबक्या आवाजात सूर
नांदेड – ए. एम.गायकवाड
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व नांदेड जिल्ह्याचे नेते अशोकराव चव्हाण यांनी अचानक काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेच्या मनात अशोकरावा बदल रोष असल्याने याचा मोठा फटका लोकसभेचे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना बसणार का..? अशोकरावावरील नाराजी प्रतापरावांना भोवणार काय..? असा प्रश्न खुद भाजप कार्यकर्त्यातूनच ऐकावयास मिळत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्यातील बडे नेते अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठी, जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता अचानक भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने निष्ठावंत, पक्षनिष्ठ, गेल्या तीस ते चालीस वर्षांपासून अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी व काँग्रेस पक्षासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाने कै. शंकरराव चव्हाण व अशोकराव चव्हाण यांना केंद्रात,राज्यात मोठे पदे व पक्षात मोठे पदे दिले.
अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री, मंत्री, असे मोठे पदे दिले व काँग्रेस पक्षाची सर्व जबाबदारी दिल्यानंतर हि अशोकराव चव्हाण यांनी पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अचानक भाजप मध्ये प्रवेश केला. ज्या जनतेने भाजपच्या विरोधात राहून अशोकराव चव्हाण यांना सबंध जिल्ह्यात ग्रामपंचायत,सेवा सोसायटी, मार्केट कमिटी,पंचायत समिती, जिल्हापरिषद, स्थानिक स्वराज संस्था, मध्यवर्ती बँक,विधानसभा, विधान परिषद सारख्या निवडणुकीत अशोकरावांना साथ देत विजयी केले.
नांदेड जिल्ह्याला काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बनविला व अशोकरावांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात व देशपातळीवर नेण्यात जिल्ह्यातील जनतेचा मोठा हात आहे. परंतु अशोकरावांनी या बदल्यात सर्वसामान्य जनता व पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना काय दिले.पक्षात राहून मोठे पदे भोगून स्वतःचा विकास करून घेतला तसेच जे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र महत्वाची पदे दिली नाहीत याच तुलनेत ज्या डी. पी. सावंतचा राजकारणाशी कांही संबंध नसताना त्यांना आमदार, ओमप्रकाश पोकर्णा सारख्याना आमदार, आमदार अमर राजूरकर यांना दोनदा आमदार केले.
बी. आर. कदम यांनाही डावलले , एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून आपल्या दाजीला भास्करराव पाटील खतगावकर यांना 85 व्या वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद व अनेकांना पक्षात महत्वाची पदे, गुत्तेदारी देऊन मोठ केले. परंतु एकनिष्ठ, पक्षनिष्ठ, अनेक वर्षांपासून पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांना डावलले. बौद्ध व मुस्लिम समाजाला नगरसेवक व महापौर यांच्या पलीकडे कोणतेही मोठे पद दिले नाही. या दोन्ही समाजातील एकालाही आमदार केले नाही.
केवळ यांना भाजप हा जातीयविरोधी पक्ष आहे म्हणून भीती दाखवून जिथे ठेवायचे तिथेच ठेवले. केवळ या समाजाचा निवडणुकी पुरताच वापर केला. ज्या सर्वसामान्य मतदारांनी अशोकरावाना मोठं केल त्यांचा विश्वासघात अशोकरावांनी केला याचा रोष जनसामान्य कार्यकर्ते, पक्षनिष्ठ, एकनिष्ठ, सर्वसामान्य जनता यांच्या मनात आहे.
नांदेड जिल्ह्यात व मराठवाड्यात आपला पक्ष मजबूत होईल व लोकसभा निवडणुकी आपल्या पक्षाला फायदा होईल या उद्देशाने भारतीय जनता पार्टीने अशोकराव चव्हाण यांना पक्षात घेतले. परंतु जिल्ह्यातील जनतेचा रोष व मराठा आरक्षणाचा मुद्यावरून मराठा समाजाचा रोष अशोकरावावर असल्यामुळे गावागावात त्यांना विरोध होत आहे.
याचा फटका मतपेटीतुन जनतेने दाखवून दिल्यास प्रतापरावांना मोठा फटका बसेल गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोकरावांचा पराभव करणाऱ्या प्रतापरावांना अशोकराव सोबत असताना पराभव झाल्यास मात्र मोठा धक्का बसेल हे मात्र विशेष..अशोकरावाबदल सर्व सामान्य जनतेत रोष…!
तुम्हीच सांगा प्रतापराव यात तुमचा काय दोष..! अशी उक्ती जणू भाजप कार्यकर्त्यातूनच ऐकावयास मिळत असल्याने अशोकरावावरील नाराजी प्रतापरावाना भोवणार काय…? असा सूर खुद भाजप कार्यकर्त्यातून दबक्या आवाजात निघत आहे.