महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
रामटेक – राजु कापसे
दिनांक १४ एप्रिल महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त राजे ग्रूप रामटेक तर्फे विचारांची भिमजयंती या उपक्रमअंतर्गत अध्यक्ष हिमांशु पानतावणे यांच्या संकल्पनेतून “आधी बाबासाहेबांना वाचूया नंतर जयंतीत नाचुया” मोफत महापुरुषांचे वैचारिक व जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपून साजरी करण्यात आली.
या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला रामटेक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात छञपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली. रामटेक शहरातील नागरिकांनी पुस्तकांसाठी रांगा लाऊन शांतापूर्ण या उपक्रमात सहभाग नोंदविला. सुमारे ६०० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकानी या भेटी देऊन उपक्रमाचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित केले.
हिमांशू पानतावणे नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीचे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवितात. युवकांचा विशेष सहभाग घेऊन समाजात जनजागृती चे कार्य करत असतात. आजच्या युवकांना महापुरुषांच्या जयंतीत फक्त नाचून, मस्ती करून नाही तर महापुरुषांचे विचार आत्मसात करावे, असा संदेश या उपक्रमातून त्यांनी दिला.
या उपक्रमासाठी राजे ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष हिमांशू पानतावणे, सुमित अंबादे, निलेश पाठक, कुलदीप चोले, जयंत रहांगडाले, तुषार चव्हाण, शुभांगी सहारे, श्रेयस मेश्राम, निमिष वराडे, शुभम डूले, धिरज राऊत, रोशन वंजारी, सुधांशू पानतावणे, तन्मय मेश्राम, पायल साहारे, जानवी साहरे, श्लोक वराडे, अंकित वाघमारे, भूषण घरजाळे, शाकीर शेख व इतर राजे ग्रूप चे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. श्री अरुणराव पानतावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला होता.