अकोला – संतोषकुमार गवई
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदारसंघासाठी 28 व्यक्तींकडून नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. त्यानुसार छाननीअंती 17 व्यक्तींचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत. नियोजनभवनात अर्जदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्यामार्फत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन, स्पेसिफाईड सहायक निवडणूक अधिकारी डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते.
स्वीकृत अर्ज प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), मुरलीधर पवार (अपक्ष), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष), धर्मेंद्र चंद्रप्रकाश कोठारी (अपक्ष), अशोक किसन थोरात (अपक्ष), रत्नदीप सुभाषचंद्र गणोजे (अपक्ष), अभय काशिनाथ पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), काशिनाथ विश्वनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी),
अनुप संजय धोत्रे (भारतीय जनता पार्टी), शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग), प्रीती प्रमोद सदांशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल), बबन महादेव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी) नारायण हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष), रविकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी),दिलीप शत्रुघ्न म्हैसने (अपक्ष) गजानन साहेबराव दोड (अपक्ष), ॲड. उज्ज्वला विनायक राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी).
अस्वीकृत अर्ज रमेश इंगळे (बहुजन समाज पार्टी), अरूण भागवत (अपक्ष), पूजा शर्मा (अपक्ष), सचिन शर्मा (अपक्ष), नितीन वालसिंगे (अपक्ष), महेंद्र मिश्रा (अपक्ष), अंबादास दांदळे (अपक्ष), प्रमोद पोहरे (अपक्ष), ॲड. रामभाऊ खराटे (वीरों के वीर इंडियन पार्टी), रजनीकांत (अपक्ष), शेख मजहर शेख इलियास (अपक्ष).