अमरावती ,दि.४ एप्रिल २०२४; धामणगाव (रेल्वे) शहरातील महावितरणची दोन स्वतंत्र कार्यालये असलेल्या ईमारतीच्या मालकांनी शंभर रूपयाच्या बंधपत्रावर महावितरणच्या स्थापत्य विभागाने ठरविलेले भाडे मान्य असल्याबाबत संमंत्रीपत्र सादर करूनही सुधारीत भाडे करार केला नाही तसेच यापूर्वीच्या दरानुसार भाडे स्विकारण्यास नकार दिला.
दरम्यान दोन्ही कार्यालयाची भाडेकरार प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने महावितरणला नाईलाजास्तव धामणगाव रेल्वेतील उपविभागीय कार्यालय आणि शहर वितरण केंद्राचे स्थलांतर जवळच असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही नारगावंडी उपकेंद्राच्या जागेत करावे लागले.
भविष्यात महावितरणला योग्य जागा मिळाल्यास पुन्हा उपविभागीय कार्यालय आणि शहर वितरण केंद्राचे स्थलांतर धामणगाव रेल्वे शहरात करण्यात येणार आहे. परंतू सध्यास्थिती कार्यालयाचे स्थलांतर झाले असले, तरी ग्राहक सेवेत अडथळा येणार नाही.शिवाय महावितरणच्या सर्वच सेवा ऑनलाईन झाल्याने ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावकर यांनी केले आहे.
धामनगाव रेल्वे येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय कार्यरत आहेत. या कार्यालयाअंतर्गत ०७ वितरण केंद्रामार्फत परिसरातील विविध वर्गवारीतील ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो.महावितरणचे उपविभागीय कार्यालय हे यापूर्वी मिरादेवी जोशी यांच्या मालकीची इमारतीत कार्यरत होते. त्याचबरोबर धामणगाव रेल्वे शहर वितरण केंद्र हे चंद्रशेखर राठी यांच्या मालकीच्या इमारतीत कार्यरत होते.
परंतू दरम्यान दोन्ही कार्यालयाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यामुळे आणि कायदेशिर गुंतागुंत वाढू नये याकरीता कार्यालयाचे स्थलांतर करण्याचे मा.न्यायालयाने आदेशाचे पालन करत महावितरणचे उपविभागीय कार्यालय आणि शहर वितरण केंद्राचे ३३ केव्ही नारगावंडी उपकेंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे.
महावितरणच्या सर्व सेवा ऑनलाईन :- वीज ग्राहकाशी संबंधित सर्वच सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. महावितरणने विविध सेवेसाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी मोबाईल एप,महावितरण संकेतस्थळ आणि १८००-२३३-३४३५/
१८००-२१२-३४३५/१९१२ ही टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याने वीज ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.