Taiwan Earthquake : तैवानमध्ये बुधवारी सकाळी जोरदार भूकंप झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता 7.4 एवढी होती. 25 वर्षांनंतर येथे एवढा शक्तिशाली भूकंप झाल्याचे बोलले जात आहे.भूकंपामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. दक्षिण जपान आणि फिलिपाइन्ससाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व तैवानमध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत, जरी जीवितहानीबद्दल त्वरित माहिती नाही.
🔥🚨BREAKING NEWS: Multiple skyscrapers and houses have collapsed in Taiwan after massive 7.5 magnitude earthquake. pic.twitter.com/CmifL5cTj1
— Dom Lucre | Breaker of Narratives (@dom_lucre) April 3, 2024
अनेक भागात बहुमजली इमारती कोसळल्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपाची तीव्रता यावरून मोजली जाऊ शकते की भूकंप होताच वीजही गेली. डोंगराला तडे गेले. पूल आणि रस्ता सगळे थरथरू लागले. अनेक शहरांमध्ये बहुमजली इमारती कोसळल्याच्याही बातम्या आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्सुनामीचा इशारा दिल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सतत हॉर्न वाजवून लोकांना हवामानाचे क्षणोक्षणी अपडेट्स दिले जात आहेत. पर्वतांच्या पायथ्याशी आणि समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. गेल्या वेळी आलेल्या त्सुनामीमुळे झालेल्या नुकसानीपासून धडा घेत यावेळी जपानने पूर्ण खबरदारी घेतली आहे.
Footage of buildings collapsing in or around Taipei, Taiwan.
— Nerdy 🅰🅳🅳🅸🅲🆃 (@Nerdy_Addict) April 3, 2024
pic.twitter.com/NHFfctgxrF