अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस कडून साजीद खान पठाण यांना उमेदवारी दिली मात्र भाजप कडून अद्याप कोणालाही उमेदवारी दिली नाही.भाजप साठी इच्छुकांची बरीच यादी आहे.
मात्र लालाजी यांचे रक्ताचे नाते नसले तरी त्या मतदार संघात लालाजी सोबत 30 वर्षे घालवणारे भाजपचे अकोला जिल्हा माध्यम समन्वयक गिरीश जोशी यांनीही उमेदवारी मागितली.
मात्र अजूनही त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही त्यांच्या नावाऐवजी इतर कार्यक्रमाचे नाव पुढे येत असल्याने भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
गिरीश जोशी हे पत्रकार असून गेल्या 30 वर्षापासून संघासोबत एकनिष्ठ काम भाऊसाहेब पुंडकर पासून ते खासदार संजय धोत्रे यांच्या सोबत काम केलेला सच्चा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात त्याम्ची ओळख आहे.
सोबतच भाजपचे अकोला जिल्हाप्रसारमाध्यांचे समन्वयक असून त्यांचा सर्व माध्यमांशी सुसंवाद सोबतच कार्यकर्ता असल्याने जनसामान्यांत लोकप्रिय आहेत. त्यामुळे अश्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी काही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र कोणाला तिकीट द्यावे भाजपपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
पोटनिवडणूक लढण्यासाठी पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. ‘अकोला पश्चिम’मध्ये उमेदवार देतांना भाजपला लोकसभा निवडणुकीचा देखील पुरेपूर विचार करावा लागणार आहे. दोन्ही निवडणुकांचे समीकरण जुळवण्याच्या दृष्टीनेच भाजप उमेदवार देण्याची शक्यता आहे.