रामटेक – राजु कापसे
प्रोव्हीडन्स इंग्लिश स्कूल मनसर रामटेक येथे नुकत्याच झालेल्या स्मार्ट TV प्रशिक्षणात गुरूवारी रामटेक तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामटेक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. या दरम्यान वर्ग 1 ते 5 या वर्गातील शिक्षकांसाठी संपर्क फाउंडेशनच्या वतीने सर्वाच्या उपस्थित 150 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण,हिंगणा, कळमेश्वर, उमरेड आणि रामटेक या ठीकाणी संपर्क फाउंडेशनने संपूर्ण शाळेला 400 स्मार्ट टीव्ही दिला होता आणि आज त्या स्मार्ट टीव्हीला जोडणारा डिवाइस गटशिक्षणाधिकारी तसेच केंद्र प्रमुख यांच्या हस्ते शिक्षकांना देण्यात आला.
रामटेक तालुक्यात 100 स्मार्ट TV आणि सोबतच डिवाईस वाटप केले. यावेळी शिक्षक प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग देणारे प्रमुख सौ. स्वाती निकोसे , महेश होले आणि स्वप्निल चिकटे यांनी शिक्षकांना खुप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले. रामटेक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे सर यांनी सर्व शिक्षकांना यासंदर्भात मार्गदर्शन केले.
रामटेक तालुक्यातील केंद्रप्रमुख प्रकाश महल्ले, चंद्रशेखर मायवाडे, प्रल्हाद कोवाचे, रमेश पवार, सुरेश पडोळे, प्रमोद सुरोसे, रामनाथ धुर्वे, विकास गणवीर उपस्थित राहून उत्तम सहकार्य केले.