Rameshwaram Cafe blast : बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटाने खळबळ उडवून दिली. या स्फोटात ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कॅफेमध्ये कोणीतरी बॅग सोडल्याने हा स्फोट झाल्याची पुष्टी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाचे सीसीटीव्ही समोर आले असून, पोलीस त्याचा तपास करत आहेत.
बंगळुरूच्या राजाजीनगर येथील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला असून, त्यात नऊ जण जखमी झाले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये IED स्फोट झाला. हा सिलेंडरचा स्फोट नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामेश्वरम कॅफेमध्ये कोणीतरी बॅग ठेवली होती.
कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर व्हाईटफिल्डच्या अग्निशमन केंद्राने सांगितले की, आम्हाला रामेश्वरम कॅफेमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याचा फोन आला होता. आम्ही घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. श्वानपथकासोबत फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. त्याचवेळी रेस्टॉरंटच्या एका सुरक्षा रक्षकाने सांगितले की, “मी कॅफेच्या बाहेर उभा होतो. अनेक ग्राहक रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होते. अचानक मोठा आवाज झाला आणि आग लागली. त्यामुळे हॉटेलमधील ग्राहक जखमी झाले.
यापूर्वी, पोलिसांनी सांगितले होते की शुक्रवारी रामेश्वरम कॅफेमध्ये संशयित एलपीजी सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याने किमान पाच जण जखमी झाले होते. मात्र, जखमींचा नेमका आकडा अद्याप देण्यात आलेला नाही. पोलिसांनी सांगितले की, पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदनहल्ली येथील रामेश्वरम कॅफेमध्ये दुपारी 1.30 ते 2 च्या दरम्यान स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात सिलिंडरचा स्फोट झाल्याचे दिसते. मात्र, या घटनेचा तपास सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करत आहोत.
Explosion at Bengaluru's Rameshwaram Cafe caught on CCTV camera
— ANI (@ANI) March 1, 2024
(Video source: Police) pic.twitter.com/lhMtK3rsOs