पुणे येथील रूग्ण हक्क परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीने गौरव गुणवंतांचा, गौरव कार्यकर्त्यांचा, गौरव कवी लेखकांचा, गौरव साहित्यिक पत्रकारांचा, गौरव कर्तृत्ववान महिलांचा.. शिव सन्मान सत्कार सोहळा २०२४ आपल्या राजाची जयंती.
शिवजयंती तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यंदाही सलग दहाव्या वर्षी रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने लाल महाल येथे “शिव सन्मान सत्कार सोहळा -२०२४ ” आयोजित करण्यात आला होता ,याच कार्यक्रमात पत्रकारीता तथा सामाजिक क्षेत्रातील उल्ले़खनीय कार्याबद्दल विकास साळवे यांना लाल महल या ऐतिहासिक भुमीत अनेक नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शिव सन्मान’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
रूग्ण हक्क परिषद ही संघटना गेल्या १० वर्षापासून रूग्णाच्या हक्कासाठी व डॉक्टरांच्या संरक्षणासाठी लढणारी संघटना असून या संघटनेच्या माध्यामातून विविध क्षेत्रात प्रमाणिकपणे उल्लेखनीय काम करणा-या कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला जातो,
या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण,तसेच पुणे शहर अध्यक्षा सौ अपर्णा साठे व त्यांची टीम यांनी या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,माजी पोलीस उपायुक्त महेंद्र गायकवाड,युक्रांदचे राज्य कार्यवाह जाबुवंत मनोहर,सुप्रसिध्द निवेदक दिपक म्हस्के आदी नामवंत मान्यवर या सन्मान सोहळ्याला उपस्थित होते