Saturday, November 23, 2024
Homeव्यापारएसीटी फायबरनेटचे मोबाईल अॅप बाजारात नव्याने दाखल...

एसीटी फायबरनेटचे मोबाईल अॅप बाजारात नव्याने दाखल…

ब्रॉडबॅण्ड आणि डिजिटल सेवा उद्योगक्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी एसीटी (एसीटी) फायबरनेटने उद्योगक्षेत्रातील ग्राहकअनुभवाची व्याख्या नव्याने घडवू पाहणाऱ्या काही अभिनव वैशिष्ट्यांसह आपले मोबाईल अॅप बाजारात नव्याने दाखल केल्याची घोषणा केली आहे.

आपल्या ग्राहकांच्या वेळेचे मोल राखण्याशी आणि इंटरनेटशी संबंधित समस्यांवरील उपाययोजना अखंडितपणे पुरविण्याशी आपली बांधिलकी जपणाऱ्या एसीटी फायबरनेटने झटपट, सुलभ आणि सहजप्राप्य उपाययोजना ग्राहकांच्या हातांच्या बोटांशी आणून ठेवण्याच्या दृष्टीने तयार केलेले एसीटी सुपर अॅप बाजारात आणले आहे.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या तसेच यूजर्सच्या विस्तारत्या वर्गाच्या पावलांशी पावले जुळवित या ब्रॉडबॅण्ड ब्रॅण्डने आपल्या मोबाईल अॅपला संपूर्णपणे नवे रूप दिले आहे. विस्तृत संशोधन हाती घेत तसेच यूजर्सच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून सुधारणेला कुठे वाव आहे हे समजून घेतल्यानंतर या नव्या अॅपची रचना करण्यात आली आहे व ते बाजारात आणण्यात आले आहे.

एसीटी सुपर अॅपचा चेहरामोहरा संपूर्णपणे वेगळा आहे, ज्यामुळे यूजर्सना बिले भरणे, समस्येची नोंद करणे, अकाऊंट्सचा मागोवा घेणे, रिमाइंडर्स सेट करणे, ग्राहकसेवा विभागाशी संवाद साधणे, प्लान अपग्रेड करणे इत्यादी कामे करणे अधिक सोपे जाणार आहे.

एसीटी फायबरनेटचे चीफ मार्केटिंग आणि कस्टमर एक्स्पीरियन्स ऑफिसर श्री. रवी कार्तिक म्हणाले, “एसीटी फायबरनेटमध्ये आम्ही आमच्या सर्व संवादबिंदूंपाशी उत्कृष्ट दर्जाचा ग्राहकअनुभव पुरविण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

आमचे नविनीकृत अॅप आमच्या याच ध्येयधोरणाशी मेळ साधत ग्राहकांचे आयुष्य अधिक सुलभ आणि अधिक सोयीचे बनविण्याच्या हेतूने सुलभ स्वरूपातील युआय तसेच अकाउंट हाताळणी व सेल्फ-केअरशी संबंधित लक्षणीयरित्या सुधारित वैशिष्ट्ये पुरविते. याच्या साथीने आमच्या ग्राहकांना एसीटी अॅडव्हान्टेजचा अनुभव येईल आणि ते नव्या अॅपचा लगेचच स्वीकार करतील, याची मला खात्री आहे.”

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: