Friday, November 22, 2024
Homeराज्यकाटोलमध्ये युवा शेतकऱ्यांनी काढली सरकारची अंत्ययात्रा...

काटोलमध्ये युवा शेतकऱ्यांनी काढली सरकारची अंत्ययात्रा…

जवाब दो यात्रेचे नियोजन, शेकाप- प्रहारचा विविध संघटनेचा पाठिंबा…

काँग्रेस -राष्ट्रवादीने फिरवली पाठ

बाशिंग बांधून बसलेले काटोल विधानसभेतील भावी आमदार कुठे गेले?

नरखेड – अतुल दंढारे

मंगळवारला काटोल शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जवाब दो यात्रेचे संयोजक सागर दुधाने व श्री प्रदीप उबाळे पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या नेतृत्वात सरकारच्या अंत्ययात्रेचे आयोजन केले होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या अनोख्या आंदोलनाची सुरुवात झाली आणि काटोल नरखेड तालुक्यातील युवा शेतकरी वर्गांनी यात्रेला प्रचंड प्रतिसाद दिला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकार पूर्ण करत नसल्यामुळे व शंभू बॉर्डर वर सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन म्हणून या अंत्ययात्रेचे नियोजन केले होते, या अंत्ययात्रेला शेकडो शेतकऱ्यांसह काटोल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रदीपजी पाटील तसेच शेकापचे श्री राहुलजी देशमुख प्रहारचे कार्यकर्ते व शेतकरी उमेश बंडे, सतीश काळे, अरूनजी ढोले, नोकराजजी चोरघडे बाबाराव वाघमारे स्वप्निल डफरे धिरज मांदळे निकेश रेवतकर. महेश दोडके. राकेश भुसारी.
आकाश ठाकरे. रामेश्वर ठोंबरे संजयजी रहाटे.स्वप्नील निमकर. चेतन गुडधे.प्रणय ठाकरे. शेतकरी नेते पत्रकार प्रशांत पवार, पंचायत समिती सदस्य अरुण ऊईके.

यासह असंख्य युवा शेतकरी तरूण वर्ग यात्रेत सहभागी होते. यावेळी उपस्थितांमध्ये सर्व शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या व आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. काटोल नरखेड तालुक्याच्या इतिहासात युवा शेतकरी वर्गाने ही यात्रा पहिल्यांदाच काढली होती. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तार बाजार जैन मंदिर त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यात काँग्रेस राष्ट्रवादी व विधानसभेच्या तयारीला बाशिंग बांधून बसलेले भावी आमदार तसेच सतरंजी संघटना यांनी सुद्धा या यात्रेला पाठ पाठविली त्यामुळे युवा शेतकऱ्यांकडून या ढोंगी राजकारणी विरोधात चिंता व्यक्त करण्यात आली. शेतकरी एकता जिंदाबादचा शेतकऱ्यांना न्याय मिळलाच पाहीजेत असा नारा देत काटोलात अंत्ययात्रा ही काढण्यात आली.

शासना विरोधात घोषणाबाजी देत. कापसाला दहा हजार प्रती भाव देण्यात यावा सोयाबीनला सात हजार. हरभरा दहा हजार. शेतीला पूर्णवेळ वीजपुरवठा करण्यात यावा. तसेच जंगली प्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी व्यवस्था करा अशा विविध मागण्या या युवा शेतकरी वर्गाकडून करण्यात आल्या होत्या.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: