आगामी लोकसभेच्या जागावाटपाबाबत शेवटची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेतेदेखील सहभागी झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालनामधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच कोणत्याही पक्षाशी युती नसताना 27 मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीने लढण्याची तयारी केली आहे. ते मतदारसंघ कोणते याची यादी देखील बैठकीत वंचितकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला 4 महत्त्वाचे प्रस्ताव पाठवले आहेत. त्यावर आता महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी आघाडी नसतांना वंचित बहुजन आघाडीने ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी.
वंचित बहुजन आघाडी तर्फे एक प्रेस नोट जरी करण्यात आली आहे…. वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन, या आधी आम्ही ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी आम्ही तयार केली होती. आता महाविकास आघाडीने आमच्या सोबत चर्चा सुरू केली आहे, तर आम्ही आमच्या त्या मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीला देत आहोत.
सदर यादी आम्ही स्वतंत्र गेलो असतो, तर त्यासाठी आम्ही तयार केली होती. आम्हाला आशा आहे की, या मतदारसंघांवर तीन पक्षांसोबत फलदायी चर्चा आणि वाटाघाटी होऊ शकतील. काही मतदारसंघ सोडून आम्ही खालील या जागांवर चर्चेला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा हा आहे की, विभाजनवादी भाजप-आरएसएसचा पराभव झाला पाहिजे आणि सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात एकजुटीने लढले पाहिजे.
1. अकोला
2. अमरावती
3. नागपुर
4. भंडारा-गोंदिया
5. चंद्रपुर
6. हिंगोली
7. उस्मानाबाद8. औरंगाबाद
9. बीड
10. शोलापुर
11. सांगली
12. माधा
13. रावेर
14. डिंडोरी
15. शिर्डी
16. मुंबई साउथ सेंट्रल
17. मुंबई उत्तर मध्य
18. मुंबई उत्तर-पूर्व
19. रामटेके
20. सतारा
21. नासिक
22. मावल
23. धुले
24. रावेर
25. नांदेड़
26. बुलढाणा
27. वर्धा
महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव…
१) महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून श्री. मनोज जरांगेपाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना म्हणून जाहीर करावे.
२) महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत. कॉमन candidate
३) महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही.
४) महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान तीन अल्पसंख्यांक उमेदवार असावेत…