राज्य उत्कृष्ट पदाधिकारी अरुण ठोंबरे, किशोर कारंजेकर, रमाकांत पाटील, डॉ.गणेश जोशी पुरस्काराचे मानकरी.
रामटेक – राजु कापसे
रामटेक देशातील क्रमांक एक नंबरची पत्रकार संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारांना सकारात्मक बातम्यांच्या पुरस्कारासोबतच संघटनात्मक दृष्टीने चांगले काम करणाऱ्या तालुका, जिल्हा, महानगर विभागीय स्तरावरील पुरस्कार देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या पुरस्काराची घोषणा संघटनेचे कार्याध्यक्ष मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी केली.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ अवॉर्ड २०२३ राज्य उत्कृष्ट तालुकाध्यक्ष म्हणून मुंबई कोकण विभाग, राजेश जागरे- शहापूर तालुका, अशोक पाटोळे- भिवंडी तालुका. विदर्भ विभागातून दिलीप घोरमारे- सावनेर तालुका, समाधान केवटे –पुसद तालुका. खानदेश विभागातून अजय भामरे- अमळनेर तालुका, राजेश माळी-तळोदा तालुका.
पश्चिम महाराष्ट्र विभागातून मच्छिंद्र बाबर- जत तालुका, संदीप मठपती- बार्शी तालुका. मराठवाडा विभागातून रणजीत गवळी- कळंब तालुका, अंड.विनोद नीला- चाकूर तालुका यांना घोषित करण्यात आले आहेत. राज्य उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष हा पुरस्कार दोन जिल्हाध्यक्षांना विभागून देण्यात आला आहे.
किशोर कारंजेकर- वर्धा जिल्हा व रमाकांत पाटील- नंदुरबार जिल्हा. राज्य उत्कृष्ट महानगराध्यक्ष म्हणून डॉ. गणेश जोशी- नांदेड यांची निवड करण्यात आली आहे. राज्य उत्कृष्ट विभागीय अध्यक्ष म्हणून मुंबई-कोकणचे विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. राजकीय, उद्योग, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या हस्ते सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी वाय. बी. चव्हाण सेंटर, मंत्रालयाच्या समोर, मुंबई याठिकाणी मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.