मागील 3 वर्षात झालीत गावात अनेक विकासात्मक कामे……
एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रासह जिल्ह्यात होत आहे एकोडी गावाच्या विकासाची चर्चा…
गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
गोंदिया तालुक्या अंतर्गत येत असलेल्या ग्राम एकोडी गावाच्या उच्च शिक्षित, शांत व मन मिळावू स्वभावाच्या महिला सरपंच शालुताई मुन्नालाल चौधरी मुळे गावात अनेक विकासात्मक कामे मागील 3 वर्षात झाल्याने एका प्रकारे विकासाची गंगाच वाहु लागलेली आहे. अशी चर्चा सध्या एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रासह जिल्ह्यात होऊ लागलेली आहे.
गावाची लोकसंख्या जवळपास 6 हजार असुन 5 वार्ड व 13 ग्राम पंचायत सदस्य आहेत ज्यामध्ये 7 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे. जेव्हा पासुन महिला सरपंच शालुताई चौधरी गावाच्या सरपंच झाल्यात तेव्हा पासुन गावात सिमेंट रस्ते, सिमेंट नाली, शाळा बांधकाम, शाळा दुरुस्ती, उप प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम, आंगनवाड़ी बांधकाम,
आंगनवाड़ी दुरुस्ती, पाणी पुरवठा बांधकाम, हाय मास्ट लाईट, एम.आर.इ.जी.एस योजना अंतर्गत कामे, नागरि सुविधा योजना अंतर्गत कामे, जनसुविधा योजना अंतर्गत कामे, सामान्य फंड अंतर्गत कामासह लोकप्रतिनिधींकडून अनेक कामे गावात करवून घेण्यास सरपंच शालुताई चौधरी यांना यश प्राप्त झालेले आहे.
ज्यामुळेच महिला सरपंच शालुताई चौधरी यांच्या मुळेच एकोडी गावात विकासाची गंगाच वाहु लागलेली आहे अशी चर्चा एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रासह जिल्ह्यात होऊ लागलेली आहे. विशेष म्हणजे एकोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही अदानी फाउंडेशन व जिल्हा परिषद गोंदिया द्वारा आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमा अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात प्रथम स्थान प्राप्त केलेले आहे. या मागचे कारण म्हणजे एकोडी ग्राम पंचायत कडून सदर शाळेच्या रंग रोटी वर लाखों रुपए खर्च करण्यात आलेले आहे.