Friday, November 22, 2024
Homeराज्यगोंडेगाव येथिल नागरिकांच्या बेमुदत धरणे आंदोलनला आ. आशीष जयस्वाल यांची भेट...

गोंडेगाव येथिल नागरिकांच्या बेमुदत धरणे आंदोलनला आ. आशीष जयस्वाल यांची भेट…

कन्हान – राजू कापसे

वेकोली द्वारे गोंडेगाव गावाचे पुनर्वसनचे कार्य पुर्ण न झाल्यामुळे आपल्याला विविध मागण्यासाठी दि.१९ फेब्रुवारी २०२४ पासून गोंडेगाव येथिल गावकरी बेमुदत धरणे आंदोलन करीत होते. याबाबत कळताच रामटेकचे आमदार ॲड आशिष जयस्वाल यांनी धरणे आंदोलन स्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या.

यावेळी तात्काळ जिल्हाधिकारी, नागपूर,वेकोली खान प्रबंधक व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्या निकाली काढल्या. यात सन १९९४ पासून वेकोलीने संपादीत केलेल्या शेत जमिनीवर नौकरी मिळाली नाही. अशा प्रकल्पग्रस्त नागरिकांना न्याय देण्यासाठी वेकोलीने आतापर्यंत किती नौकरी दिली आहे.

कुठल्या तत्त्वावर दिली आहे याची अधिकृत माहिती पुरविणार, नवीन गावात झालेल्या नागरिक सुविधांची जिल्हाधिकारी मार्फत शहानिशा करण्यात यावी व अपुऱ्या नागरीक सुविधा पोस्ट ऑफिस, बँक, वाचनालय,कोंडवाडा,अंगणवाडी, तलाव, मैदानाचे सौंदर्यीकरण,नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, गटार लाईन, सिमेंट रस्ता, भूमिगत नाल्यावरील कव्हरींग, रस्त्याच्या कडेला गट्टू बसविणे, मुख्य जागी हायमस्क लाईट बसविणे. यासंदर्भात RNR पॉलिसी नुसार आतापर्यंत कुठल्या सुविधा पुरविण्यात आल्या. त्याची माहिती वेकोलीने तात्काळ द्यावी.

विद्युत बिलाची रक्कम पूर्तता करण्याची क्षमता ग्राम पंचायत कडे नाही. कायदेशीर विज बिल देय हे वेकोलीने स्वतःकडे हस्तांतरित करावे. यावर तात्काळ खंडीत विज पुरवठा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. गोंडेगाव ग्रा. पं. च्या सुधारीत अधिसूचना काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई येथे संपर्क साधून येत्या १० दिवसात गोंडेगाव ग्रा. पं. ची सुधारीत अधिसूचना प्रकाशित करण्यात येईल.

प.ह.नं.१३ अंतर्गत गोंडेगाव येथिल उर्वरीत शेत जमिनी संपादित करून त्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या सोबत चर्चा केली आणि वेकोली खान प्रबंधक यांना तात्काळ झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे सांगितले. तसेच १ महिन्याच्या आत जागा अधिग्रहीत करण्याचे निर्देश दिले.

वेकोली कडे ग्राम पंचायतचा थकित कर तात्काळ देण्याचे सांगितले. असे झाले नाही तर शासकीय नियमानुसार वेकोलीवर जप्तीची कारवाई करण्यात बाबत गट विकास अधिकारी, पारशिवनी यांना निर्देश दिले.

गोंडेगाव येथिल नागरिकांची मागणी दि.०२ मार्च २०२४ पर्यंत पुर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे आ. आशिष जयस्वाल यांनी वेकोलीच्या खान प्रबंधक व अधिकाऱ्यांना ठणकावले. त्यानूसार सुरु असलेल्या धरने आंदोलनाला नागरिकांनी स्थगीती दिली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: