IPL 2024 Schedule : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक गुरुवारी (22 फेब्रुवारी) प्रसिद्ध झाले आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज खेळणार आहे. हा सामना त्याच्या घरच्या मैदानावर 22 फेब्रुवारीला एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईची स्पर्धा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाशी होणार आहे. 21 सामन्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे.
IPL 2024 schedule announced for first 21 matches till April 7
— ANI (@ANI) February 22, 2024
Defending champions Chennai Super Kings to play Royal Challengers Bangalore in the opening match on March 22 in Chennai. pic.twitter.com/NAe3kVdR1b
चेन्नईचा संघ विक्रमी नवव्यांदा आयपीएलच्या कोणत्याही मोसमातील पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी, संघाने 2009, 2011, 2012, 2018, 2019, 2020, 2022 आणि 2023 मध्ये उद्घाटन सामना खेळला आहे. देशात यावर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. आता १५ दिवसांचा कार्यक्रम समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
संपूर्ण आयपीएल देशात होणार आहे
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सांगितले की, संपूर्ण स्पर्धा भारतातच आयोजित केली जाईल. केवळ 2009 मध्ये आयपीएल संपूर्णपणे परदेशात (दक्षिण आफ्रिका) खेळली गेली, तर 2014 मध्ये, सार्वत्रिक निवडणुकांमुळे, काही सामने UAE मध्ये खेळले गेले. तथापि, 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुका असूनही ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. आयपीएल संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी टी-20 विश्वचषक सुरू होणार असल्याने अंतिम सामना 26 मे रोजी होण्याची शक्यता आहे.
IPL 2024 schedule for the first 21 matches. #IPLOnStar. pic.twitter.com/hNlgoSzae7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 22, 2024