शाहिर…विक्रांत राजपूत
दानापूर – गोपाल विरघट
दानापूर येथील हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयाच्या प्रांगणात प्रहार जनशक्ती पार्टी व लोकजागरमंच आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिनांक 17 फेब्रुवारी ला सायंकाळी 7 वाजता शाहिर विक्रांत राजपूत यांच्या पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाहिर विक्रांत राजपूत यांनी आपल्या पोवाड्यातुन आजच्या काळातील परिस्थितीवर बोलताना आपल्या पोवाड्यातुन अंधार झाला फार आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, आणि शिवा पाहिजे असेल,तर जिजाऊ जन्माला घालावी लागेल.
मुलींना वाचवा,मुलगी असेल तर तुमच्या घरात शिवाजी जन्माला येईल ती वाचलीच नाही तर कुठुन येणार.आपल्या मुली मुलांनवर चांगले संस्कार टाकावे लागतील. त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे, छत्रपती महाराणा प्रताप,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आदी थोरपुरुषाच्या कार्याची माहिती आपल्या गायनातुन उपस्थित तरुण युवक, महिला प्रतिष्ठित नागरिक यांना देऊन त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागृत केले.
शाहिर विक्रांत राजपूत यांचा लोकजागर व प्रहार जनशक्ती पार्टी वतीने अनिल गावंडे यांनी,राजपूत समाजाच्या वतीने व ढाकरे परिवारा तर्फे वतीने शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यातआला. त्याच प्रमाणे दानापूर ग्रामस्थ व हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयाच्या वतीने व्यवस्थापक डॉ. अजय विखे यांनी अनिल गावंडे यांचा शाल श्रीफळ देऊन,
यावेळी सत्कार केला.सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रहार जनशक्ती पार्टी व लोकजागरमंचाचे अनिल गावंडे,मनिष भांबुरकर ,डॉ. अजय विखे, सुधाकर खुमकर, संतोष माकोडे पोलिस पाटील ,भारतीय सैनिक सुरेश येऊल, उपसरपंच सागर ढगे,शाम ढाकरे,पत्रकार संजय हागे, प्रमोद हागे, सुनिल धुरडे,रविंद्र ढाकरे,
गोपाल विरघट,फुंडकर गुरुजी , नितीन घायल यांनी पुजन केले व यानंतर शाहिर विक्रांत राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र पोहाड्यातुन सादर केले.
यावेळी प्रहार जनशक्ती व लोक जागर मंचाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी तरुण युवक महिला,शाळेचे विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन कराळे गुरुजी यांनी आपल्या बानेदार शैलीने केले. तर आभार मनिष भांबुरकर यांनी केले.