रामटेक – राजु कापसे
राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत इयत्ता आठवीतील निसर्गदुतांनी शाळेच्या आवारात असलेल्या चबुतऱ्यावर भारतीय पक्षांची हुबेहूब चित्रे काढून ‘पेंच निसर्ग निवारा’ साकारला. या बाल चित्रकारांनी काढलेली पक्षांची चित्रे शाळेत येणाऱ्या पालकांचे व प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात.
ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी विविध सुप्त गुण असतात. अशा कृतिशील उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुण वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक साक्षोधन कडबे यांनी केले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य सोनीराम धोटे यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षक नीलकंठ पचारे याप्रसंगी शिक्षक राजीव तांदूळकर, नीलकंठ पचारे, प्रशांत पोकळे, दिलीप पवार, सतीश जुननकर, शैलेंद्र देशमुख, अमित मेश्राम, सौ. तारा दलाल, सौ. अर्चना येरखेडे, करीना धोटे, शिक्षकेत्तर कर्मचारी मोरेश्वर दुनेदार, राशिद शेख आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.