California Family Tragedy : अमेरिकेत भारतीय समुदायाच्या लोकांना टार्गेट करण्याची प्रक्रिया थांबायचं नाव घेत नाही. दरम्यान, भारतीय वंशाच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळल्याची बातमी आहे. यामध्ये दोन चार वर्षांच्या जुळ्या मुलांचाही समावेश आहे. ही हत्या आहे की आत्महत्येचा, याचा तपास आता पोलीस करत आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंद सुजीत हेन्री, त्यांची पत्नी ॲलिस प्रियांका आणि त्यांची जुळी मुले अशी मृतांची नावे आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. कॅलिफोर्नियातील सॅन माटेओ येथे सोमवारी ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी स्थानिक रहिवाशांनी 911 वर कॉल करून कळवले की त्यांना अनेक दिवसांपासून घरातून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि घर गाठले. प्राथमिक तपासात पोलिसांना घरात कोणीही शिरल्याची चिन्हे आढळून आली नाहीत. खून आणि आत्महत्या या दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोर्टाच्या नोंदीनुसार, पतीने डिसेंबर २०१६ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. दोन लहान मुले बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलांवर गोळ्यांच्या जखमा नव्हत्या. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
त्यांच्या शरीरावर हल्ल्याच्या कोणत्याही खुणा नसल्यामुळे मुलांचा गळा दाबून खून करण्यात आला किंवा त्यांना जीवघेणा ओव्हरडोज दिला गेला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी बाथरूममध्ये आढळून आले. दोघांनाही गोळ्या लागल्या. बाथरूममध्ये एक 9 एमएम पिस्तूल आणि लोडेड मॅगझिन सापडले.
अलिकडच्या काही महिन्यांत एका भारतीय विद्यार्थ्यासह भारतीय वंशाच्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनमध्ये एका रेस्टॉरंटबाहेर भारतीय वंशाच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी शिकागोमध्ये सय्यद मजहीर अली या भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला होता. त्याआधी जॉर्जियाच्या लिथोनिया शहरात एका अमली पदार्थाच्या व्यसनाधीन व्यक्तीने भारतीय विद्यार्थी विवेक सैनी याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.
#CaliforniaFamilyTragedy
— India Focus (@IndiaFocusnews) February 14, 2024
California: The tragic demise of a four-member Malayali family in San Mateo, California, USA, has raised suspicions of underlying family problems. The deceased individuals, hailing from Kollam, include Anand Sujit Henry (42), sonhttps://t.co/931wpHtsqN pic.twitter.com/CfqMFJwYRl