Haldwani Violence : उत्तराखंडच्या हल्दवानी येथील बनभूलपुरा भागात दगडफेक झाली. मलिक यांच्या बागेतील अवैध अतिक्रमण तोडण्यासाठी गेलेल्या महापालिका आणि पोलिसांच्या पथकावर स्थानिक लोकांनी दगडफेक केली. यामध्ये रामनगर कोतवालसह 50 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. हल्लेखोरांनी महापालिकेचा जेसीबी फोडून पोलिसांच्या जीप, ट्रॅक्टरसह अनेक वाहनांची जाळपोळ केली.
छतावरून दगडांचा पाऊस
बनभूलपुरा परिसरात अतिक्रमणाच्या जागेभोवती वस्ती आहे. येथे दोन ते तीन मजली घरे बांधण्यात आली असून, त्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. समोरून पोलिस-प्रशासनाच्या पथकावर हल्लेखोरांनी दगडफेक सुरू करताच छतावरून दगडांचा वर्षाव सुरू झाला. प्रशासनाने पाडलेल्या अतिक्रमणाचा मलबा लोकांनी गच्चीवर जमा केला होता. अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या पोलीस आणि प्रशासनाच्या लोकांवर गच्चीवरून गोळ्यांच्या वेगाने होणाऱ्या दगडांचा वर्षाव करण्यात आला. रस्त्यावर उपस्थित असलेल्या लोकांना ना लपायला जागा सापडत होती ना घराच्या छतावर जाण्याचा मार्ग दिसत होता.
या गोंधळानंतर शहराला छावणीचे स्वरूप आले आहे. प्रशासनाने सायंकाळी उशिरा हल्लेखोरांच्या पायात गोळ्या झाडण्याचे आदेश जारी केले. एका व्यक्तीला गोळी लागल्याची माहिती आहे.
Why #HaldwaniIsBurning ?
— Gega Updates™ (@gegaupdates) February 9, 2024
📍Uttarakhand
There was an illegal Madrasa.
Court ordered to demolish the illegal structure.
Administration went to demolish illegal Madrasa in #Haldwani.
But,
Islamists started pelting stones & attackîng.
pic.twitter.com/fnMMvHsSQm
350 हून अधिक राउंड फायर करण्यात आले
मलिकच्या बागेच्या आजूबाजूला दगडफेकीत पोलिसांचा ताफा अडकल्यानंतर कसा तरी येथून निसटून मुख्य रस्त्यावर आला. मात्र येथेही बनभूलपुरा पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे वाहनही हल्लेखोरांनी पेटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी एके ४७, एसएलआर आणि पिस्तुलाने हवेत शेकडो राउंड गोळीबार केला. यानंतरही जेव्हा दगडफेक झाली तेव्हा लोकांच्या पायात गोळ्या लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने हल्लेखोरांना हुसकावून लावण्यासाठी 350 हून अधिक राउंड फायर केले. त्यानंतर घटनास्थळावरून लोकांनी पल काढला.
दगडफेक करणाऱ्यांनी घराचे दरवाजे तोडून बाहेर काढले.
बनभूलपुरा येथे अतिक्रमण तोडण्यासाठी गेलेल्या पथकावर घरांच्या छतावरून दगडफेक करण्यात आली, त्यानंतर दगडफेक करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ज्या घरांवरून दगडफेक केली जात होती त्या घरांकडे धाव घेतली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या घरांचे दरवाजे विटांनी तोडून पोलिस घरात घुसले. त्यानंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना पकडून तेथून नेण्यास सुरुवात केली, मात्र आंदोलकांनी त्यांचीही सुटका केली.
#WATCH | Haldwani violence | DM Nainital, Vandana Singh says, "…It is an empty property that has two structures, which is not registered as religious structure or has been given any such recognition. Some call the structure a Madrasa…" pic.twitter.com/wqFziPnGTn
— ANI (@ANI) February 9, 2024
ज्याला मदरसा म्हटले जात आहे ते नोंदणीकृत नाही
वादाला तोंड फुटणाऱ्या मदरशाच्या विध्वंसबाबत डीएम सिंह म्हणाले की, ही एक रिकामी मालमत्ता आहे ज्यामध्ये दोन संरचना आहेत. त्यांची ना धार्मिक संरचना म्हणून नोंदणी आहे किंवा त्यांना अशी कोणतीही मान्यता नाही. काही लोक या रचनेला मदरसा म्हणतात. मालमत्तांवर स्थगिती नसल्याने आम्ही अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. येथे अतिक्रमण काढण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात आला.
Looks like "Shoot At Sight" order was just for Muslims.#Haldwani #Uttarakhand pic.twitter.com/ZdPOlbcNPz
— Mister J. – مسٹر جے (@Angryman_J) February 9, 2024