रामटेक – राजु कापसे
दिनांक 08/02/024 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना (उ. बा. ठा)पक्षाचे ग्रा.जिल्हा प्रमुख श्री.देवेंद्र गोडबोले व रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशाल बरबटे यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांसह औष्णिक ऊर्जा केंद्र,कोराडीचे मुख्य अभियंता श्री. मोटघरे यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन देतांना श्री. विशाल बरबटे यांनी औष्णिक ऊर्जाचा राख साठवूनुक बांध वेळोवेळी कसा काय फुटतो असा सवाल निवेदन देतांना उपस्थित करून सदर फुटलेल्या बांधाची सखोल चौकशी करून त्वरित पुनर्बांधणी करावी व संबंधित दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाही करावी.अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल अशी चेतावणी देण्यात आली.असे यावेळी श्री. विशाल बरबटे यांनी म्हटले.
यावेळी निवेदन देतांना प्रामुख्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य युवासेना हर्षल काकडे,रामटेक विधानसभा सहसंपर्क प्रमुख सुत्तम मस्के,कामठी-मौदा विधानसभा सहसंपर्क प्रमुख समीर सोनारे, तालुका प्रमुख कैलास खंडार, हेमराज चोखांद्रे, युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर, कामगार सेना जिल्हा प्रमुख समीर मेश्राम,मौदा तालुका संपर्क प्रमुख नरेश भोंदे युवतीसेना जिल्हाधिकारी अपूर्वा पित्तटवार, रामटेक शहर प्रमुख बादल कुंभलकर,
तालुका संघटक गणेश मस्के,अनिल येळणे, उपतालुका प्रमुख सुनील सहारे, देवराव ठाकरे,शुभम धावडे,कामगार सेना विधानसभा प्रमुख कमलेश वासनिक,वाहतूक सेना विधानसभा प्रमुख सावन लोंधे,कामगार सेना तालुका संघटक अंकित बचले,कन्हान शहर प्रमुख कामगार सेना राजन पौनीकर,टेकाडी सर्कल प्रमुख जितेंद्र जांबे,युवासेना संघटक रुक्षित भोतकर,सावनेर युवासेना उपतालुका प्रमुख प्रशांत निमोणे सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते